Video : अफगाण चाहत्यांचा पाकला चोप तर भारताची गळाभेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs Afghanistan

Video : अफगाण चाहत्यांचा पाकला चोप तर भारताची गळाभेट

IND vs AFG 2022 Viral Video : आशिया कप मध्ये सुपर-4 सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर टीम इंडिया आशिया कपमधून बाहेर पडली. टीम इंडियाने आशिया कप 2022 च्या त्यांच्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानचा 101 धावांनी पराभव केला होता, मात्र या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भारत आणि अफगाणिस्तानचे चाहते एकमेकांना मिठी मारून भारत आणि अफगाणिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत आहेत.

हेही वाचा: Asia Cup नंतर स्पष्ट, रोहित 'या' फ्लॉप खेळाडूंना T-20 World Cup साठी देणार संधी

भारत आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बुधवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे संघ आमनेसामने होते. या सामन्यादरम्यान दोन्ही संघांचे खेळाडू मैदानात भिडले. त्याचवेळी स्टँडमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे चाहते आमनेसामने आले. भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ आशिया कप 2022 च्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. आशिया चषक 2022 च्या अंतिम फेरीत 11 सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका संघ आमनेसामने येणार आहेत.

हेही वाचा: VIDEO: गजब बेइज्जती है यार! रिझवानचे मैदानात असे कृत्य पाहूण बाबर आझम म्हणाला - 'कर्णधार मी...'

अफगाणिस्तानमधील एका ट्विटर युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारत आणि अफगाणिस्तानचे चाहते एकमेकांना मिठी मारत आहेत. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हबीब खान नावाच्या एका ट्विटर युजरने व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, अफगाणिस्तान आणि भारत सामन्यादरम्यान दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये बंधुभाव होता. यासोबतच दोन्ही देशांच्या चाहत्यांना मिठी मारल्यानंतर ते भारत झिंदाबाज आणि अफगाणिस्तान झिंदाबाजच्या घोषणा देताना दिसत आहेत.

Web Title: India Vs Afghanistan Match Both Countries Fans Hugging In Stadium Sports Cricket Viral Video Ind Vs Afg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..