IND vs AUS 1st Test Day 2 : भारताकडे भक्कम आघाडी; दोन डावखुऱ्यांची दमदार फलंदाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India Vs Australia 1st Test Day 2

IND vs AUS 1st Test Day 2 : भारताकडे भक्कम आघाडी; दोन डावखुऱ्यांची दमदार फलंदाजी

दुसऱ्या सत्राचा खेळ संपला

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 144 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी अर्धशतके झळकावली. हे दोन्ही फलंदाज सध्या नाबाद आहेत. पटेलने 52, तर जडेजाने 66 धावा केल्या आहेत.

जडेजानंतर अक्षनेही ठोकले अर्धशतक

रवींद्र जडेजानंतर अक्षर पटेलने अर्धशतक पूर्ण केले. पटेलने दुसरे कसोटी अर्धशतक ९४ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने झळकावले. दोन्ही फलंदाजांनी भागीदारी करत भारताला पुन्हा एकदा मजबूत स्थितीत आणले आहे.

भारताची ३०० धावांची आघाडी, अक्षर पटेल अर्धशतकाच्या वाटेवर

अक्षर पटेल अर्धशतकाच्या जवळ पोहोचला आहे. डीप मिड-विकेटमध्ये लबुशनेच्या षटकातील पहिल्या चेंडूवर त्याने शानदार चौकार ठोकला.

रविंद्र जडेजाने ठोकलं अर्धशतक

रवींद्र जडेजाने 114 चेंडूंत 7 चौकारांसह अर्धशतक झळकावले. या शतकाचा आनंद जडेजाने तलवारीसारखी बॅट फिरवत साजरा केला. भारताने 80 धावांची आघाडी घेतली आहे.

केएस भरत एलबीडब्ल्यू आऊट झाला, टॉड मर्फीने डेब्यूतच घेतल्या पाच विकेट

केएस भरतला बाद करून टॉड मर्फीने पदार्पणाच्याच सामन्यात पाच विकेट घेतल्या आहेत. भरतने केवळ 8 धावा केल्या.

151-4 : विराट कोहली स्वस्तात माघारी 

लंचपर्यंत विराट कोहलीने कर्णधार रोहित शर्माला साथ दिली. मात्र त्यानंतर टॉड मर्फीने भारताची चौथी शिकार करत विराटला 12 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता धरायला लावला.

135-3 (44.1 Ov): मर्फीने दिले भारताला दोन धक्के

ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू टॉड मर्फीने भारताला दोन धक्के दिले. त्याने 23 धावा करून सेट होऊ पाहणाऱ्या आर अश्विनला बाद केले. त्यानंतर चेतेश्वर पुजाराला देखली 6 धावांवर बाद करत भारताला तिसरा धक्का दिला.

भारताची शंभरी पार

पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने आपला डाव 1 बाद 77 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. काल शुन्यावर खेळत असलेल्या अश्विनने आज आपले खाते उघडले. त्याने रोहित शर्माच्या साथीने भागीदारी रचण्यास सुरूवात केली. या दोघांनी भारताचे शतक धावफलकावर लावले.

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू 

अश्विनने खाते उघडले

India Vs Australia 1st Test Day 2 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने सामन्यावरील आपली पकड अजून मजबूत केली. कर्णधार रोहित शर्माचे झुंजार शतक, अक्षर आणि रविंद्र जडेजा या डावखुऱ्या जोडगोळीची अर्धशतके या जोरावर भारताने दुसऱ्या दिवसअखेर 7 बाद 321 धावांपर्यंत मजल मारली.

भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी कांगारूंवर पहिल्या डावात 144 धावांची आघाडी घेतली आहे. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर ही आघाडी निर्णायक ठरेल. ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणारा फिरकीपटू टॉड मर्फीने 5 विकेट्स घेत भारताच्या कसलेल्या फलंदाजीला भगदाड पाडले. त्याला नॅथन लयॉन आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी 1 विकेट घेत चांगली साथ दिली.