IND vs AUS 2nd T20 : हिटमॅन रोहितची धडाकेबाज फलंदाजी, भारताने मालिका आणली बरोबरीत

India vs Australia 2nd T20I Live Cricket Score Highlights Rohit Sharma Jasprit Bumrah Virat Kohli
India vs Australia 2nd T20I Live Cricket Score Highlights Rohit Sharma Jasprit Bumrah Virat Kohli esakal

IND vs AUS 2nd T20 : भारताचा कर्णधार रोहित शर्माने कॅप्टन्स इनिंग खेळत भारताला दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून दिला. भारताने ऑस्ट्रेलियाचे 91 धावांचे आव्हान 7.2 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. रोहित शर्माने नाबाद 46 धावा केल्या. दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकाच्या पहिल्याच दोन चेंडूवर एक षटकार एक चौकार मारत सामना संपवला. हार्दिक पांड्याने 9, राहुलने 10 आणि विराटने 11 धावा केल्या. झाम्पाने दोन विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने 20 चेंडूत 43 तर कर्णधार फिंचने 15 चेंडूत 31 धावा केल्या.

डीकेचा फिनिशिंग टच

दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकात 9 धावांची गरज असताना पहिल्या दोन चेंडूवरच एक षटकार आणि एक चौकार मारत सामना खिशात घातला.

पॅट कमिन्सने हार्दिकला बाद करत दिला चौथा धक्का 

 55-3 : झाम्पाने भारताला दिले पाठोपाठ दोन धक्के

अॅडम झाम्पाने पाचव्या षटकात पहिल्यांदा विराट कोहली आणि त्यानंतर सूर्यकुमार यादवला बाद करत भारताला पाठोपाठ दोन धक्के दिले.

51-1 (4 Ov) : विराटच्या चौकाराने भारताचे अर्धशतक 

विराट कोहलीने चौकार मारत भारताचे अर्धशतक धावफलकावर लावले. मात्र त्यानंतर झॅम्पाने विराटचा 11 धावांवर त्रिफळा उडवत भारताला दुसरा धक्का दिला.

39-1 : झाम्पाने भारताला दिला पहिला धक्का

अॅडम झाम्पाने भारताला पहिला धक्का दिला. त्याने केएल राहुलला 10 धावांवर बाद केले.

रोहित - राहुल जोडीने पहिल्याच षटकात केल्या 20 धावा

ऑस्ट्रेलियाचे 91 धावांचे आव्हान घेऊन मैदानात आलेल्या भारताने हेजवलूडच्या पहिल्याच षटकात 20 धावा चोपल्या. सलामीवीर रोहित शर्माने दोन तर केएल राहुलने एक षटकार मारला.

AUS 90/5 (8) : मॅथ्यू वेडची आक्रमक फलंदाजी 

मॅथ्यू वेडने आक्रमक फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला मोठ्या धावसंख्येकडे नेले. त्याने 20 चेंडूत 43 धावा करत ऑस्ट्रेलियाला 90 धावांपर्यंत पोहवले.

बुमराहच्या परफेक्ट यॉर्करने फिंचची झुंजार खेळी संपवली

दुखापतीनंतर पहिल्यांदाच खेळत असणाऱ्या जसप्रीत बुमराहने आपल्या पहिल्याच षटकात एक परफेक्ट यॉर्कर टाकत 14 चेंडूत 31 धावा करणाऱ्या फिंचचा त्रिफळा उडवला.

31-3 : अक्षर पटेलचा धमाका 

अक्षर पटेलने भेदक मारा करत टीम डेव्हिड आणि ग्लेन मॅक्सवेलचा त्रिफला उडवत कांगारूंना दोन धक्के दिले.

14-1 : ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का

पहिल्या सामन्यातील हिरो कॅमेरून ग्रीनला विराट कोहलीने धावाबाद केले.

रोहित शर्माने नाणेफेक जिंकली

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येकी 8 षटकांचा होणारा सामन्यात भारताने संघात दोन बदल केले आहेत. भुवनेश्वर कुमारच्या जागी ऋषभ पंतला संधी मिळाली आहे तर उमेश यादवच्या जागी जसप्रीत बुमराह संघात आला आहे.

सामना होण्याची शक्यता; 9.15 ला टॉस, 9.30 ला सामना

पंचांनी मैदानाची पहाणी केली. त्यानंतर आता सामना होण्याची शक्यता बळावली आहे. पंचांनी दोन्ही कर्णधारांकडे एक कागद दिला आहे. तसेच काही खेळाडू देखील मैदानावर वॉर्म अप करण्यासाठी आले आहेत. पंचांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकी 8 षटकांचा सामना होणार आहे. 2 षटकांचा पॉवर प्ले आणि प्रत्येक गोलंदाज प्रत्येकी 2 षटके टाकू शकतो.

पंच अजूनही साशंक; तपासणी 8.45 ला  

नागपूरमध्ये गेल्या दोन दिवसात खूप मोठा पाऊस झाला आहे. त्यामुळे मैदान अजून ओलं असून पंच देखील कोणताही जोखीम घेऊ इच्छित नाही. गोलंदाज रन अप ज्या भागातून घेतो. मैदानाचा तोच भार अजून ओला असल्याने मैदानाची पुढची तपासणी 8.45 ला होणार आहे.

ओल्या मैदानामुळे नाणेफेकीस उशीर 

नागपूरमध्ये गेले काही दिवस पाऊस पडत असल्याने मैदान ओले झाले आहे. आजच्या सामन्यावर देखील पावसाचे सावट आहे. दरम्यान, ओल्या मैदानामुळे नाणेफेकीस उशीर होत आहे. आता सायंकाळी 7 वाजता मैदानाची पुन्हा तपाणी केली जाणार आहे.

दुसऱ्या टी 20 सामन्यावर पावसाचे ढग

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्याला थोड्याच वेळात सुरूवात होत आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे ढग दाटून आले असून सामन्यात व्यत्यय येण्याची दाट शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com