IND vs AUS 3rd T20I : सूर्या - विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs Australia 3rd T20I  Live

IND vs AUS 3rd T20I : सूर्या - विराट खेळीवर पांड्याने उमटवली विजयी मोहर; भारताचा 1 चेंडू राखून विजय

IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 - 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 तर विराट कोहलीने 63 धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्याने 16 चेंडूत 25 धावा करत भारताला 1 चेंडू राखून सामना जिंकून दिला. गोलंदाजीत अक्षर पटेलने तीन विकेट घेतल्या.

हार्दिक पांड्याने उमटवली विजयी मोहर

विराट कोहलीचे अर्धशतक

चांगल्या सुरूवातीनंतर थोडी संथ झालेली खेळी विराट कोहलीने आक्रमक केली. विराटने 37 चेंडूत 50 धावा करत भारताला 16 व्या षटकात 150 च्या जवळ पोहचवले.

134-3 : सूर्यकुमार यादवची 360 खेळी आली संपुष्टात

भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार यादवने 36 चेंडूत 69 धावांची खेळी केली. त्याने मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात फटकेबाजी करत विराट कोहलीसोबत तिसऱ्या विकेटसाठी 62 चेंडूत 104 धावांची भागीदारी रचली. मात्र हेजलवूडने त्याची खेळी 14 व्या षटकात संपुष्टात आणली.

भारताला मोठा धक्का; कर्णधार रोहित शर्मा बाद 

पॅट कमिन्सने 14 चेंडूत 17 धावा करणाऱ्या रोहित शर्माला बाद करत भारताला दुसरा आणि मोठा धक्का दिला.

5-1 : भारताला पहिल्याच षटकात पहिला धक्का

डॅनियल सॅम्सने पहिल्याच षटकात केएल राहुलला 1 धावेवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला.

AUS 186-7 : शेवटच्या षटकात हर्षल पटेलचा टिच्चून मारा

शेवटच्या षटकात हर्षल पटेलने पहिलाच चेंडू फूल टॉस टाकत षटकार खाल्ला. मात्र त्यानंतर त्याने पुढच्या पाच चेंडूत 1 धाव देत एक विकेट घेतली. त्याने 27 चेंडूत 54 धावा करणाऱ्या डेव्हिडला बाद केले.

टीम डेव्हिडकडून भुवनेश्वरची धुलाई

18 वे षटक टाकणाऱ्या भुवनेश्वर कुमारच्या शेवटच्या तीन चेंडूवर दोन षटकार आणि एक चौकार मारत टीम डेव्हिडने 21 धावा वसूल केल्या. डेव्हिडने डॅनियल सॅम्ससोबत 51 धावांची भागीदार रचली.

117-6 : अक्षरने केला मोठा अडसर दूर 

गेल्या दोन सामन्यात दमदार फलंदाजी करून भारतीय गोलंदाजांना जेरीस आणणाऱ्या मॅथ्यू वेडला अक्षर पटेलने अवघ्या 1 धावेवर पॅव्हेलियनचा रस्ता धरायला लावला.

कांगारूंचा निम्मा संघ माघारी  

ऑस्ट्रेलियाच्या पाठोपाठ दोन विकेट पडल्यानंतर टीम डेव्हिड आणि जॉश इग्निस यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी कांगारूंचे शतक धावफलकावर लावले. मात्र अक्षर पटेलने 22 चेंडूत 24 धावा करणाऱ्या इग्निसला बाद केले.

84-4 : स्मिथ देखील पॅव्हेलियनमध्ये

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथला युझवेंद्र चहलने 9 धावांवर यष्टीचीत करत ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का दिला.

75-3 : अक्षर पटेलची थेट फेकी मॅक्सवेल बाद 

अक्षर पटेलने थेट फेकी करत धोकादायक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला 6 धावांवर धावबाद केले.

 62-2 : अखेर भुवनेश्वरने संपवली ग्रीनची फटकेबाजी

कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावत दमदार सुरूवात केली. अखेरीस भुवनेश्वर कुमारने त्याची 52 धावांची खेळी पाचव्या षटकात संपवली.

कॅमेरून ग्रीनचे धडाकेबाज अर्धशतक

ऑस्ट्रेलियाला धडाकेबाज सुरूवात करून देणाऱ्या कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले.

44-1 : कांगारूंचा कर्णधार माघारी

अक्षर पटेलने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचला 7 धावांवर बाद केले.

AUS 40/0 (3) : ग्रीनची आक्रमक सुरूवात 

प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. कॅमेरून ग्रीनने तुफान फटकेबाजी करत 3 षटकात 40 धावा करून दिल्या.

रोहितने नाणेफेक जिंकली

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात ऋषभ पंतला जागा मिळालेली नाही. तर भुवनेश्वर कुमार संघात परतला आहे. डावखुरा फलंदाज म्हणून अक्षर पटेल संघात खेळत आहे.