World Cup Final: धावा कमी..हार्दिक..बॉलिंग; भारतीय टीमच्या पराभवानंतर राहुल द्रविड काय म्हणाला?

वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला आहे. यावेळी भारतीय संघाचे कोच राहुल द्रविड याने पत्रकारांशी संवाद साधला.
India vs Australia Final Highlights Cricket World Cup 2023 indian cricket team coach rahul dravid knp94
India vs Australia Final Highlights Cricket World Cup 2023 indian cricket team coach rahul dravid knp94

नवी दिल्ली- वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला आहे. यावेळी भारतीय संघाचे कोच राहुल द्रविड याने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी द्रविड म्हणाले की, भारतीय संघाने संपूर्ण वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण, दुर्दैवाने त्यांना अंतिम सामना जिंकता आला नाही. शेवटी हा खेळ आहे. (India vs Australia Final Highlights Cricket World Cup 2023 indian cricket team coach rahul dravid)

४० ते ५० धावा कमी पडल्या असं मला वाटतं. वर्ल्डकपमध्ये आपली कामगिरी चांगली होती. पण, दुर्दैवाने आपला अंतिम सामन्यात पराभव झाला. ड्रेसिंग रुपमध्ये सर्वजण भावूक झाले आहेत. मला माहिती आहे त्यांनी कशा प्रकारे मेहनत घेतली आहे. पण, शेवटी हा खेळ आहे. यातून आम्ही पुन्हा उभे राहू. शेवटी खूप गोष्टी शिकायला मिळतात, असं राहुल म्हणाले.

India vs Australia Final Highlights Cricket World Cup 2023 indian cricket team coach rahul dravid knp94
Ind Vs Aus World Cup Final: नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये लाखो चाहत्यांचा 'हनुमान चालिसे'चा जप; व्हिडिओ व्हायरल...

आपली टीम घाबरुन खेळली असं मी म्हणणार नाही, कारण पहिल्या दहा ओव्हरमध्ये आपले ८० रन्स झाले होते. पुढे जाऊन धावा काढता येतील या इराद्याने प्रत्येक खेळाडू खेळतो. पण, विकेट पडल्यानंतर पुन्हा नव्याने रणनीती आखावी लागते. पण, अंतराने आपले विकेट पडत गेले. शिवाय ऑस्ट्रेलियाने चांगली कामगिरी. त्यामुळे त्यांनी २४० पर्यंतच रोखलं, असंही तो म्हणाले.

संघाने क्रिकेटप्रेमींना चांगली खेळी करुन दाखवली, त्यांचे मनोरंजन केले आहे. आजच्या सामन्यामुळे थोडीशी निराशा नक्कीच आली आहे. सर्वात जास्त निराशा ड्रेसिंग रुममध्ये आहे. पण, यातून अनेक सकारात्मक गोष्टीही बाहेर आल्या आहेत. हार्दिक दुखापतीमुळे बाहेर पडला. पण, इतर खेळाडूंनी त्याची कमी भरुन काढली, असं राहुल म्हणाले.

India vs Australia Final Highlights Cricket World Cup 2023 indian cricket team coach rahul dravid knp94
World Cup: पराभव पत्कराव्या लागलेल्या भारतीय टीमसाठी पंतप्रधान मोदींचा हृदयस्पर्शी संदेश

बॉलिंगमध्ये खूप काही सुधारणा झाली आहे. पण, यामागे अनेक वर्षांची मेहनत आहे. शमी, बुमराह आणि सिराज यांनी चांगली कामगिरी केली आहे.ऑस्ट्रेलियाने आज चांगली बॉलिंग केली. त्याचं क्रेडिट त्यांना द्यायला पाहिजे, असं राहुल द्रविड म्हणाले. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com