IND vs BAN: टीम इंडियाच्या 'या' खेळाडूची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच संपली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs Bangladesh

IND vs BAN: टीम इंडियाच्या 'या' खेळाडूची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच संपली!

India vs Bangladesh : तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने भारताचा एक विकेटने पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच संपली. रविवारी पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण हा खेळाडू ठरला. टीम इंडियामध्ये संधी मिळणे इतके सोपे नाही आणि एखाद्या खेळाडूने संधी वाया घालवली तर त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजेही बंद होतात.

हेही वाचा: MS Dhoniला ट्रोल करणाऱ्या पाकिस्तानी पत्रकारला अमित मिश्राने दिले सडेतोड उत्तर

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने वेगवान गोलंदाज कुलदीप सेनला मोठ्या आत्मविश्वासाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली, पण या खेळाडूने तो विश्वास खराब केला. उमरान मलिकसारख्या धोकादायक वेगवान गोलंदाजाला बाहेर बसवून कुलदीप सेनला पदार्पणाची संधी देण्यात आली, पण तो फ्लॉप ठरला.

हेही वाचा : First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडेत कुलदीप सेन चांगलाच महागात पडला. या सामन्यात कुलदीप सेनने केवळ 5 षटकात 37 धावा दिल्या. कुलदीप सेनला 2 विकेट मिळाल्या तरीही त्याने 7.40 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या, जे टीम इंडियासाठी खूप हानिकारक ठरल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7.40 चा इकॉनॉमी रेट अत्यंत खराब कामगिरी मानला जातो.

हेही वाचा: IND vs BAN: पराभवानंतर संघात मोठा बदल! 'या' धाकड खेळाडूची रॉयल एंट्री

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला 186 धावांपर्यंत मजल मारता आली. भारतीय संघाला हे आव्हान वाचवता आले असते, पण कुलदीप सेनच्या खराब गोलंदाजीमुळे ते शक्य झाले नाही. भारताला आता बुधवार 7 डिसेंबरला बांगलादेश विरुद्ध दुसरा वनडे सामना खेळायचा आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कुलदीप सेनचा बाहेर पडणे निश्चित मानले जात आहे आणि उमरान मलिक त्याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये परत येऊ शकतो.