रोहित विराटवर BCCI संतापली; दिली वॉर्निंग, काय आहे कारण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rohit sharma and virat kohli

रोहित विराटवर BCCI संतापली; दिली वॉर्निंग, काय आहे कारण?

इंग्लंड दौऱ्यावर ऐतिहासिक कसोटी खेळण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. अश्विन सध्या क्वारंटाईनमध्ये आहे. कोविड-१९ पॉझिटिव्ह असल्याने अश्विन भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर जाऊ शकला नाही. टीम इंडिया १ जुलैपासून एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे.

इंग्लंडला पोहोचल्यानंतर काही तासांतच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली. ज्यामध्ये दोघेही इंग्लंडमध्ये फिरत आहेत. रोहित आणि विराटच्या या कृतीमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आता चांगलेच संतापले आहे. इंग्लंडमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढल्यानंतर बोर्डाला खेळाडूंची काळजी आहे.

रोहित आणि विराटच्या या चुकीनंतर बीसीसीआय संतापली असून या दोन्ही दिग्गजांना बोर्डाकडून वॉर्निंग देण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी गेल्या आठवड्यात लीसेस्टर आणि लंडनमध्ये चाहत्यांसोबत सेल्फी घेतली, जिथे भारतीय संघ लीसेस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबविरुद्धच्या सराव सामन्याची तयारी करत आहे. रोहित आणि विराटने मास्क न घालता शॉपिंग केल्याचेही वृत्तसमोर आले होते. खेळाडूंच्या या कृतीला गांभीर्याने घेत बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी तसे न करण्याचा इशारा दिला आहे.

इंग्लंडमध्ये कोविड-19 ची प्रकरणे अजूनही खूप जास्त आहे. देशात दररोज 10,000 हून अधिक नवीन प्रकरणे समोर येत आहे. रोहित आणि विराटची ही चूक त्यांना एजबॅस्टन कसोटीतूनही बाहेर करू शकते. या १७ सदस्यीय संघातील सर्व खेळाडू इंग्लंडला पोहोचले आहेत.