
थोडक्यात
इंग्लंडने चौथ्या कसोटीच्या पहिल्या दोन दिवसांत भारतावर वर्चस्व गाजवले आहे.
भारताचा पहिला डाव ३५८ धावांवर संपला असून इंग्लंडने दोन गडी गमावून २२५ धावा केल्या आहेत.
भारतीय गोलंदाजी कमकुवत ठरली; जसप्रित बुमराह आणि अंशुल कंबोज प्रभाव टाकण्यात अपयशी ठरले.
लंडन : भेदक गोलंदाजी आणि आक्रमक फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने भारताविरुद्धच्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यावर दोनच दिवसांत मजबूत पकड मिळवली आहे. मालिकेत आव्हान कायम ठेवायचे असेल, तर भारतीय संघाला विराट कोहलीसारख्या मानसिकतेची गरज आहे, असा सल्ला इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी दिला.
ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीत भारताचा पहिला डाव ३५८ धावांवर संपुष्टात आला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने दोन गडी गमावत २२५ धावा करत पहिल्या डावात भक्कम आघाडी घेण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.