
मँचेस्टर : पहिल्या आणि तिसऱ्या कसोटीत विजयाची संधी गमावल्यानंतर आता मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी उद्यापासून सुरू होत अससलेल्या चौथ्या कसोटीत भारताला इंग्लंडविरुद्ध विजय आवश्यक आहे, मात्र हवामानात बदल झाल्यामुळे इंग्लंड संघासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. अशा परिस्थितीत शुभमन गिलच्या संघासमोरचे आव्हान अधिकच वाढले आहे.