IND vs ENG मालिकेपूर्वी वाईट बातमी, हा दिग्गज खेळाडू घेणार निवृत्ती!

भारत आणि इंग्लंड मालिकेपूर्वी एक वाईट बातमी समोर येत आहे
england captain Eoin Morgan to retire from international cricket
england captain Eoin Morgan to retire from international cricket

भारत आणि इंग्लंड मालिकेपूर्वी एक वाईट बातमी समोर येत आहे. इंग्लंडचा वनडे आणि टी-20 कर्णधार इऑन मॉर्गन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. खराब फॉर्म आणि फिटनेसला कंटाळून इयॉन मॉर्गन हा निर्णय घेतला असल्याचा दावा इंग्रजी माध्यमांनी केला आहे. जोस बटलर त्याच्या जागी मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार बनणे जवळपास निश्चित आहे. इंग्लंडला पुढील महिन्यात भारताविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिका खेळायची आहे. अशा स्थितीत मॉर्गनने निवृत्ती जाहीर केल्यास इंग्लंडसाठी तो मोठा धक्का असेल.(england captain Eoin Morgan to retire from international cricket)

england captain Eoin Morgan to retire from international cricket
ENG vs NZ: तिसऱ्या सामन्यातही इंग्लंडने वर्चस्व राखले, बेन स्टोक्स बदलले नशीब

मॉर्गन बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्मशी लढत आहे. यंदाच्या आयपीएल लिलावात त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते. नेदरलँड्सविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये तो शून्य धावांवर बाद झाला आणि दुखापतीमुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला तो खेळू शकला नाही. मॉर्गनने गेल्या २८ आंतरराष्ट्रीय डावांमध्ये फक्त दोन अर्धशतके झळकावली आहेत.

england captain Eoin Morgan to retire from international cricket
स्मृती मानधनाने T20I क्रिकेटमध्ये रचला इतिहास, रोहित -विराटच्या क्लबमध्ये सामील

2015 विश्वचषकात इंग्लंडच्या निराशाजनक कामगिरीनंतर अ‍ॅलिस्टर कुकच्या जागी मॉर्गनची एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली. इयॉन मॉर्गनने आपल्या कर्णधारपदाखाली इंग्लंड क्रिकेट संघाचे नशीब बदलले. त्याच्या नेतृत्वाखाली 2019 मध्ये इंग्लंड प्रथमच 50 षटकांचा विश्वचषक जिंकून दिला. 2006 मध्ये स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात आयर्लंडकडून खेळताना त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आयर्लंडकडून 22 एकदिवसीय सामने खेळल्यानंतर तो इंग्लंड क्रिकेट संघात सामील झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com