
बर्मिंगहॅम : तळाच्या फलंदाजांचे अपयश, स्वैर गोलंदाजी आणि सुमार क्षेत्ररक्षण यामुळे पहिला कसोटी सामना गमावण्याची वेळ आलेल्या भारतीय संघाला या सर्व चुका सुधारून नव्या उमेदीने मैदानात उतरावे लागणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना उद्यापासून सुरू होत असताना अंतिम संघ निवडीचेही कोडे सोडवावे लागणार आहे.