
Hockey India: सलग दोन ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक पटकावलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाला एफआयएच प्रो लीगच्या यंदाच्या मोसमात अद्याप ठसा उमटवता आलेला नाही. भारतीय हॉकी संघाने चार सामन्यांमधून दोन विजयांसह सहा गुणांची कमाई केली आहे, मात्र सातत्यपूर्ण खेळाचा अभाव व पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात येत असलेले अपयश भारतीय संघाचा पाय खोलात नेत आहे. अशातच भारतीय हॉकी संघासमोर आज (ता. २१) आयर्लंडचे आव्हान असणार आहे. संध्याकाळी ७.३० वाजता सामना रंगणार आहे.