Ishan Kishan IND vs NZ: दुहेरी शतकवीर किशनला मिळाली संधी!

ICC T20I Rankings Ishan Kishan
ICC T20I Rankings Ishan Kishansakal
Updated on

Ishan Kishan India vs New Zealand 1st ODI Playing 11: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका आजपासून सुरू होत आहे. पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

इशान किशनने त्याच्या शेवटच्या वनडेत बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावले, पण श्रीलंकेविरुद्धच्या तीनही सामन्यांमध्ये त्याला संधी मिळाली नाही. केएल राहुल हा यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळत होता. इशान किशनला सलामीऐवजी मधल्या फळीत खेळण्याची संधी मिळणार आहे.

ICC T20I Rankings Ishan Kishan
Rishabh Pant Update: हॉस्पिटल मधून पंतला मिळणार डिस्चार्ज? लवकरच मैदानात...

न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया संघात 3 बदल करण्यात आले आहेत. शार्दुल ठाकूरचे पुनरागमन झाले आहे. हार्दिक पांड्याला गेल्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. तेही हा सामना खेळत आहेत. शुभमन गिलने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत चांगली कामगिरी केली.

त्याने पहिल्या सामन्यात अर्धशतक आणि शेवटच्या सामन्यात शतक झळकावले. त्याचबरोबर विराट कोहलीने 3 पैकी 2 सामन्यात शतक झळकावून किवी संघाला सावध केले आहे. रोहितही फॉर्मात आहे, पण त्याच्या बॅटने बरेच दिवस शतक झळकावलेले नाही. अशा स्थितीत ही उणीव त्यांना मालिकेने पूर्ण करायची आहे.

ICC T20I Rankings Ishan Kishan
Ranji Trophy: निवडकर्त्यांचे तोंड बंद! सर्फराजचे खणखणीत शतक; अजिंक्य रहाणे मात्र...

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर नजर असेल. पॉवरप्लेमध्ये तो सातत्याने विकेट घेत आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धही चांगली गोलंदाजी केली आणि भारतासाठी सर्वाधिक 9 विकेट घेतल्या.

भारतीय संघ : रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com