IND vs NZ 1st Test शुबमन गिलचा अर्धशतकी 'चौकार' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shubman Gill
IND vs NZ 1st Test शुबमन गिलचा अर्धशतकी 'चौकार'

IND vs NZ 1st Test शुबमन गिलचा अर्धशतकी 'चौकार'

sakal_logo
By
सुशांत जाधव

India vs New Zealand, 1st Test : भारतीय संघातील सलामीचा फलंदाज शुबमन गिल याने पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला दमदार सुरुवात करुन दिलीये. अजिंक्य रहाणेनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मयंक अग्रवाल आणि शुबमन गिल जोडीनं संघाच्या डावाला सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या 21 धावा असताना मयंक अग्रवालच्या रुपात जेमिसन याने टीम इंडियाला पहिला धक्का दिला.

त्यानंतर शुबमन गिलने संघाच्या डावाला आकार दिला. पुजाराच्या साथीने डाव पुढे नेत त्याने कसोटी कारकिर्दीतील चौथे अर्धशतक पूर्ण केले. कसोटी क्रिकेटमध्ये 91 ही शुबमन गिलची सर्वोच्च खेळी आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात त्याला पहिले वहिले शतक पूर्ण करण्याची संधी आहे.

कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या उपहारापर्यंत टीम इंडियाने 29 षटकात एका गड्याच्या मोबदल्यात धावफलकावर 82 धावा लावल्या होत्या. शुबमन गिल 87 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 52 धावांवर नाबाद खेळत होता. दुसऱ्या बाजूला चेतेश्वर पुजाराने 61 चेंडूचा सामना करताना 15 धावा केल्या आहेत. या जोडीने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली असून यात आणखी भर काढून संघाला मजबूत स्थितीत नेण्यास ही जोडी प्रयत्नशील असेल. दिवसाअखेरपर्यंत शुबमन गिल नाबाद राहिला तर त्याच्या खात्यात पहिले वहिले कसोटी शतक जमा होईल, असे वाटते. न्यूझीलंडकडून कायले जेमिसन याने एकमेव विकेट मिळवली आहे.

loading image
go to top