
असा पराक्रम करणारा भारतीय संघातील तो पहिलाच फलंदाज ठरलाय
India vs New Zealand, 1st Test first Indian debutant to register a century and fifty in the same Test match : कानपूर कसोटीत मुंबईकर श्रेयस अय्यरने आणखी एक आश्वासक खेळी केली. भारतीय संघ अडचणीत असताना दुसऱ्या डावात त्याने अर्धशतक पूर्ण केले. 109 चेंडूचा संयमी सामना करत त्याने अर्धशतकाला गवसणी घातली. पहिल्या डावातही श्रेयस अय्यरने शतकी खेळी साकारली होती. आपल्या खेळीतील सातत्य कायम राखून डगमगती नय्या पार करण्याच्या इराद्याने तो मैदानात खिंड लढवतोय. पदार्पणातील सामन्यात पहिल्या डावात शतक आणि त्यापाठोपाठ दुसऱ्या डावात अर्धशतक करणारा भारताचा तो पहिलाच फलंदाज ठरलाय.
भारतीय संघाच्या धावफलकावर 3 बाद 41 अशी धावसंख्या असताना श्रेयस अय्यर मैदानात उतरला. तो आला आणि सलामीवीर मयंक अग्रवाल चालता झाला. रविंद्र जाडेजाला साउदीनं खातंही उघडू दिलं नाही. भारतीय संघाची अवस्था 5 बाद 51 अशी बिकट झाली होती. अय्यरने अश्विनच्या साथीनं संयमी खेळ करत संघाच्या डावाला आकार दिला. या जोडीनं अर्धशतकी खेळी करुन डाव सावरला. टीम इंडियाने 103 धावा केल्या असताना अश्विनने त्याची साथ सोडली. वृद्धिमान साहाच्या साथीने अय्यरने पुन्हा गड राखण्याच्या इराद्याने डाव पुढे सरकवला. वैयक्तिक अर्धशतकासह अय्यरने साहाच्या साथीनंही अर्धशतकी भागीदारी पूर्ण केलीये.
पदार्पणाच्या सामन्यात दोन्ही डावात 50 हून अधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत पहिले नाव येते ते दिलावर हुसेन यांच. त्यांनी 1933/34 मध्ये इंग्लंड विरुद्ध कोलकाताच्या मैदानात 59 आणि 57 धावा केल्या होत्या. 1970-71 मध्ये सुनील गावसकरांनी वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केले होते. पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानात त्यांनी पहिल्या डावात 65 तर दुसऱ्या डावात नाबाद 67 धावांची खेळी केली होती. श्रेयस अय्यरने पहिल्या डावात 105 आणि दुसऱ्या डावात 60 धावांची खेळी केली.
पदार्पणाच्या कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत शिखर धवन अव्वलस्थानी आहे. त्याने 2012-13 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोहालीच्या मैदानातून धवनने कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली होती. या सामन्यात त्याने 187 धावा केल्या होत्या. रोहित शर्माने कोलकाताच्या मैदानात वेस्ट इंडीज विरुद्धच्या कसोटी सामन्यात 177 धावा केल्या होत्या. अय्यरने कानपूरच्या मैदानात 170 धावा केल्या. यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.