रोहित-द्रविड पर्वात टीम इंडियाने जिंकली पहिली मालिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs NZ

रोहित-द्रविड पर्वात टीम इंडियाने जिंकली पहिली मालिका

India vs New Zealand, 2nd T20I : रांचीच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यातील विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिका खिशात घातली. भारतीय संघाने हा सामना 7 विकेट्सने जिंकत मालिका 2-0 अशी खिशात घातली. केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत साउदीच्या टीमने पहिल्या दोन्ही सामन्यात नाणेफेक गमावली. रोहितने टॉसवेळी बाजी मारून टीम इंडियाने मॅचही जिंकून दाखवली. कॅचेस विन द मॅचेसप्रमाणे टॉससे विन द मॅचेस असे समीकरण नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत अनुभवायला मिळाले होते. याचीच पुनरावृत्ती भारत-न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेत पाहायला मिळाली.

पहिल्यांदा बॅटिंग करताना न्यूझीलंडच्या संघाने निर्धारित 20 षटकात 6 बाद 153 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना रोहित-राहुल जोडीनं संघाला दमदार सुरुवात करुन दिली. लोकेश राहुलने 49 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 65 धावांची खेळी केली. कर्णधार रोहित शर्माने 36 चेंडूत 1 चौकार आणि 5 षटकाराच्या मदतीने 55 धावा कुटल्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 117 धावा केल्या. ही जोडी माघारी परतल्यानंतर पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक झळकवणारा सुर्यकुमार अवघ्या एका धावेची भर घालून माघारी फिरला.

द्रविड-रोहित पर्वातील पहिला विजय

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय टी-20 संघाची जबाबदारी विराट कोहलीच्या खांद्यावरुन रोहित शर्माकडे आली. दुसरीकडे रवि शास्त्रींचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर द्रविडची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेनं रोहित-द्रविड पर्व सुरु झाले. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाने या दौऱ्यापासून तयारी सुरु केली असून रोहित-द्रविड पर्वातील हा पहिला मालिका विजय ठरला. ने