
विराटपेक्षा भारी ठरतोय रोहित, दुसऱ्या मॅचमध्ये पुन्हा दिसली झलक
न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा रोहित शर्माने टॉस जिंकला आहे. त्याने पहिल्या मॅचप्रमाणेच पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहली नाणेफेक वेळी अयशस्वी ठरायचा. रोहित शर्माने त्याची जागा घेतल्यापासून टॉसचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागताना दिसतोय. हा रोहितचा तसा दुसरा सामना असला तरी टॉसमध्ये तो विराटपेक्षा भारी ठरताना दिसतोय.
भारतीय संघात मोहम्मद सिराजच्या जागेवर हर्षल पटेलला संधी देण्यात आली आहे. त्याचा हा पदार्पणाचा सामना असेल. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्या पर्वातील टीम इंडियात दुसऱ्या गड्याने पदार्पण केले आहे. याअगोदरच्या सामन्यात व्यंकटेश अय्यरला संधी मिळाली होती.
New Zealand (Playing XI): मार्टिन गप्टील, डॅरेल मिशेल, मार्क चॅपमॅन, ग्लेन फिलिप्स, टीम सेफर्ट (यष्टीरक्ष), जेम्स नीशम, मिशेल सँटनर, इश सोधी, टीम साउदी (कर्णधार), एडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट.
India (Playing XI): लोकेश राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल.