IND vs NZ : लोकेश राहुलच्या जागी इशान किशनला संधी; ऋतूराज बाकावरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ishan Kishan
IND vs NZ : लोकेश राहुलच्या जागी इशान किशनला संधी; ऋतूराज बाकावरच

IND vs NZ : लोकेश राहुलच्या जागी इशान किशनला संधी; ऋतूराज बाकावरच

India vs New Zealand, 3rd T20I : कोलकाताच्या इडन गार्डन्सच्या मैदानात न्यूझीलंडच्या संघाने कॅप्टन बदलला. पण नाणेफेकीत त्यांना पुन्हा अपयश आले. रोहित शर्माने सलग तिसऱ्यांदा टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दोन सामन्यात टिम साउदीने संघाचे नेतृत्व केले होते. दोन्ही सामन्यात टॉससह न्यूझीलंडने मॅच गमावली होती. कोलकाताच्या मैदानात भारतीय संघातही बदल करण्यात आला आहे. लोकेश राहुलला विश्रांती देत इशान किशनला संधी देण्यात आली आहे. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात आवेश खानला पदार्पणाची संधी मिळेल, अशी चर्चा होती. पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही. याशिवाय ऋतूराज गायकवाडवरही बाकावरच बसण्याची वेळ आली आहे.

India (Playing XI): रोहित शर्मा (कर्णधार) ईशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल.

New Zealand (Playing XI) : मार्टिन गप्टिल, डॅरेल मिशेल, मार्क चॅपमॅन, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), जेम्स निशम, मिशेल सँटनर (कर्णधार), लॉकी फर्ग्युसन, ईश सोधी, ट्रेंट बोल्ट, एडम मिल्ने.

loading image
go to top