India Vs Pakistan : पाकिस्तानला पाणी पाजण्यासाठी ही आहे 'पंचसुत्री', कुलदीप विजयाची चावी

India Vs Pakistan
India Vs Pakistanesakal

IND vs PAK Asia Cup 2023 : आशिया कपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना होणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र दिवसाची सुरूवात ही निरभ्र आकाशाने झाली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना भारत - पाकिस्तान सामन्याचा थरार पाहण्याची संधी मिळणार आहे. (Asia Cup 2023)

भारत जरी तगडा संघ असला तरी पाकिस्तानला देखील हलक्यात घेऊन चालणार नाही. पाकिस्तानने आशिया कपच्या पहिल्या सामन्यात नेपाळचा 238 धावांनी विजय मिळवला. यात बाबर आझमने 151 धावांची तर इफ्तिकार अहमदने 109 धावांची खेळी केली होती. शादाब खानने 4 विकेट्स आणि शाहीनशाह आफ्रिदीने 2 विकेट्स घेत गोलंदाजीत चमक दाखवली होती.

त्यामुळे पाकिस्तानला हरवण्यासाठी टीम इंडियाला विशेष रणनिती आखावी लागणार आहे. या रणनितीमध्ये पाच मुद्दे फार महत्वाचे ठरणार आहेत.

India Vs Pakistan
IND Vs PAK Live Score : कँडीत पाऊस थांबला, किती वाजता सुरू होणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना?

बाबर आझमला रोखणे

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने पहिल्याच सामन्यात 151 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याने सुरूवातीच्या पडझडीनंतर पाकिस्तानचा डाव सावरला होता. बाबरने 2023 मध्ये आतापर्यंत 12 वनडे सामने खेळले आहेत. त्या त्याने 57.41 च्या सरासरीने 689 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघाला बाबरला लवकरात लवकर पॅव्हेलियनमध्ये पोहचवावे लागणार आहे.

सलामीवीरांना लवकर बाद करणे

बाबर सोबतच पाकिस्तानची सलामी जोडी फखर जमान आणि इमाम उल हक यांनी देखील या वर्षी दमदार कामगिरी केली आहे. फखर जमानने 12 सामन्यात 596 तर इमाम उल हकने 9 सामन्यात 361 धावा केल्या आहेत. जर भारतीय संघाला पाकिस्तानची जोडी लवकरात लवकर बाद करण्यात यश आले तर त्यांच्या मधल्या फळीवर दबाव निर्माण होईल.

शाहीनवर तोडगा काढावा लागेल

पाकिस्तानची वेगवान गोलंदाजीची धार ही कायमच दमदार असते. पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीनशाह आफ्रिदी हा पॉवर प्लेमध्ये प्रतिस्पर्धी संघाला धक्के देण्यात तरबेज आहे. त्यामुळे त्याला सुरूवातीच्या काळात सांभूळ खेळणे गरजेचे आहे. त्याने 2023 मध्ये 8 वनडे सामन्यात 16 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे आफ्रिदीसमोर सावध सुरूवात आणि नंतर आक्रमक फलंदाजी अशी रणनिती आखावी लागेल.

India Vs Pakistan
IND vs PAK Weather : क्रिकेटप्रमींसाठी आनंदाची बातमी; अखेर सूर्यनारायण प्रसन्न झाला!

रोहित - कोहलीला जबाबदारी घ्यावी लागेल

भारतीय फलंदाजीमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली ही अनुभवी जोडी पाकिस्तानविरूद्ध चांगली कामगिरी करत आली आहे. आजच्या सामन्यात देखील या दोघांना भारतीय फलंदाजीचा भार आपल्या खांद्यावर घ्यावा लागणार आहे. जर भारतीय संघ पाकिस्तानविरूद्ध चांगली धावसंख्या उभारू शकला तर सामन्यावर पकड निर्माण करणं सोपं होईल.

रोहित शर्माने पाकिस्तानविरूद्ध आशिया कपमध्ये (वनडे) 7 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 73.40 च्या सरासरीने 367 धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीने आशिया कपमध्ये (वनडे) पाकिस्तानविरूद्ध 3 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 206 धावा केल्या आहेत. त्याने 2012 मध्ये 183 धावांची दमदार खेळी केली होती. यावेळी भारताने पाकिस्तानचे 330 धावांचे आव्हान पार केले होते.

कुलदीप यादवकडे विजयाची किल्ली

भारताचा डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव आजच्या भारत - पाकिस्तान सामन्यात महत्वाची भुमिका बजावू शकतो. श्रीलंकेच्या फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर कुलदीप पाकिस्तानच्या मधल्या फळीला सुरूंग लावू शकतो.

कुलदीपने पाकिस्तानविरूद्ध 3 वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने 22 ची सरासरी आणि 4.07 च्या इकॉनॉमी रेटने 5 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने बाबर आझमला दोनवेळा बाद केले आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com