India Vs Pakistan : यांना सीमेवर पाठवा! नेटकऱ्यांना पंत - चहलची शाहीनशी 'जवळीक' खटकली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India Vs Pakistan Asia Cup 2022 Fans Criticize Indian Players For Friendly Behavior Towards Shaheen Afridi

India Vs Pakistan : यांना सीमेवर पाठवा! नेटकऱ्यांना पंत - चहलची शाहीनशी 'जवळीक' खटकली

India Vs Pakistan Asia Cup 2022 : भारत - पाकिस्तान यांच्यात 28 ऑगस्टला दुबईत आशिया कपमधील पहिला सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी खेळाडूंपाठोपाठ चाहत्यांनी देखील दंड थोपटले असून सोशल मीडियावर या हाय व्होल्टेज सामन्याचीच क्रेझ दिसून येत आहे. दरम्यान, भारतीय संघातील काही खेळाडू सरावादरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीला भेटले. यावेळी ऋषभ पंत, युझवेंद्र चहल, केएल राहुल आणि विराट कोहलीने त्याच्याशी हस्तांदोलन देखील केले. (India Vs Pakistan Asia Cup 2022 Fans Criticize Indian Players For Friendly Behavior Towards Shaheen Afridi)

हेही वाचा: Video : पहिलं प्रेम ते पहिलं प्रेम! माजी CSK थला रैनाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

भारतीय संघातील बऱ्यात खेळाडूंनी गुडघा दुखावलेल्या शाहीन आफ्रिदीला त्याच्या रिकव्हरीसाठी शुभेच्छा दिल्या. शाहीन दुखापतीमुळे आशिया कपला मुकला आहे. मात्र तो संघासोबत प्रवास करत आहे. दरम्यान, भारतीय संघातील खेळाडू शाहीन आफ्रिदीची आपूलकीने चौकशी करताना दिसले त्यावेळी सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांनी भारतीय खेळाडूंना ट्रोल करण्यास सुरूवात केली.

अनेक नेटकऱ्यांनी या दोन कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या देशांमधील खेळाडूंच्या फ्रेंडली वागण्याचे कौतुक केले. तर काहींनी यावर टीका करत खेळाडूंना भारतीय जवनांनी सीमेवर दिलेल्या बलिदानाची आठवण करून दिली. एका नेटकऱ्याने 'भावा पुढच्यावेळी या सर्वांना सामीवर पाठवा. आपल्या देशाची आणि सैनिकांच्या बलिदानाची चेष्टा सुरू केली आहे.' अशी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा: India Vs Pakistan : बुडत्याचा पाय खोलात! Asia Cup मध्ये पाकिस्तानला अजून एक धक्का?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 28 ऑगस्टला होणाऱ्या या सामन्याकडे टी 20 वर्ल्डकपमधील पराभवाची परतफेड करण्याची नामी संधी म्हणून देखील पाहिले जात आहे. दुबईच्या याच मैदानावर गेल्या वर्षी टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्स राखून पराभव केला होता. त्यावेळी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी दमदार फलंदाजी केली होती. तर शाहीन आफ्रिदीने भारताची टॉप ऑर्डर उडवली होती.

Web Title: India Vs Pakistan Asia Cup 2022 Fans Criticize Indian Players For Friendly Behavior Towards Shaheen Afridi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..