IND vs PAK : पाकिस्तानी रिझवान तयारीला लागला रे... नेट्समध्ये सरावाचा Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mohammad rizwan

IND vs PAK : पाकिस्तानी रिझवान तयारीला लागला रे... नेट्समध्ये सरावाचा Viral Video

Mohammad Rizwan Asia Cup 2022 : आशिया चषक 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे. 28 ऑगस्टला आशिया चषक 2022 च्या ब्लॉकबस्टर सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्याची अनेक दिवसांपासून क्रिकेट चाहते वाट पाहत होते. त्याचबरोबर या सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू जोरदार सराव करत आहेत. या आशिया चषकपूर्वी पाकिस्तानचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानचा सरावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा: Asia Cup : आशिया कपपूर्वी 'या' खेळाडूने वाढलं कप्तान रोहितचं टेन्शन

पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिझवान आशिया चषकापूर्वी दुबईत जोरदार सराव करताना दिसत आहे. मोहम्मद रिझवानच्या सरावाच्या वेळी पाकिस्तानचा फलंदाजी कोच मोहम्मद युसूफही त्याला सल्ला देताना दिसत आहे. रिझवान सराव सत्रादरम्यान नो लुक शॉट्स खेळताना दिसत आहे. त्याच वेळी तो त्याच्या स्टॅन्स आणि फूटवर्कवर काम करत आहे.

हेही वाचा: Legend Cricket : लिजेंड्स लीग क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर, पाकिस्तानचे क्रिकेटपटू नाहीत

मोहम्मद रिझवानला गेल्या 7 डावात केवळ एकच अर्धशतक झळकावता आले आहे. हे अर्धशतकही नेदरलँडविरुद्धच केले होते. या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये रिझवानने 7 सामन्यात 33.50 च्या सरासरीने केवळ 201 धावा केल्या आहेत. तसेच, रिझवानचा स्ट्राईक रेट देखील फक्त 81 आहे. जे सध्याच्या क्रिकेटच्या युगानुसार खूपच कमी आहे. रिझवान फॉर्मात नसल्याचे स्पष्ट झाले असून ही पाकिस्तानसाठी चिंतेची बाब आहे.

Web Title: India Vs Pakistan Asia Cup 2022 Mohammad Rizwan Practices Power Hitting Ind Vs Pak Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..