Asia Cup 2023 Schedule: वर्ल्ड कपआधी 16 दिवसांत 3 वेळा भारत-पाकिस्तानमध्ये लढत? कशी अन् कधी, जाणून घ्या

Asia Cup 2023 Schedule
Asia Cup 2023 Schedule
Updated on

Asia Cup 2023 Schedule : बहुचर्चित आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक अखेर आज जाहीर झाले. सर्वांना उत्सुकता असलेली भारत-पाक गटसाखळी लढत श्रीलंकेच्या कँडी शहरात २ सप्टेंबर रोजी होणार आहे आहे. सुपर फोरमध्येही या दोन संघांत सामना होण्याची शक्यता असून तो सामना १० सप्टेंबर रोजी कोलंबोत होईल आणि अंतिम फेरी गाठली, तर १७ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत-पाक लढत अपेक्षित असेल.

Asia Cup 2023 Schedule
Ind vs Pak Asia Cup: राजवर्धननंतर सुदर्शनने उडवली झोप, भारताचा दणदणीत विजय, पाकिस्तानला पाजले पराभवाचे पाणी

स्पर्धेची सुरुवात मुलतानमध्ये (पाकिस्तान) होऊन सांगता श्रीलंकेत होणार आहे. ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर असा स्पर्धेचा कालावधी असेल. हायब्रिड मॉडेलनुसार होणाऱ्या या स्पर्धेत एकूण १३ सामने होणार आहेत. पाक आणि श्रीलंका अशा दोन देशांत सामने होणार असले, तरी सामने सुरू होण्याची वेळ दुपारी १ ही निश्चित करण्यात आली आहे. त्यावेळी पाकमध्ये १.३० वाजलेले असतील. भारत आणि श्रीलंका यांची प्रमाणवेळ समान आहे.

Asia Cup 2023 Schedule
Asia Cup Schedule : आशिया कपच्या शेड्युल मध्ये झालाय मोठा घोळ, फॅन्सना अजूनही सुटले नाही कोडे

सहा संघांची दोन गटात विभागणी असून अ गटात भारत, पाक, नेपाळ; तर ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. गटातील पहिले दोन संघ सुपर फोरसाठी पात्र ठरतील. भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीसाठी ही आशिया करंडक स्पर्धाही ५०-५० षटकांची असणार आहे.

हायब्रीड मॉडेलनुसार पाकमध्ये चारच सामने होणार आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार पाकचे हे चारही सामने एकाच शहरात होणार होते; पण पाक मंडळाचे नवे अध्यक्ष झाका अश्रफ यांनी मुलतान या आणखी एका शहराची निवड केली आहे. त्यामुळे उर्वरित तीन सामने लाहोर येथे होतील.

Asia Cup 2023 Schedule
Asia Cup Schedule 2023: आशिया कप 2023 चे वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी होणार भारत-पाकिस्तान सामना

गटातील निकाल काहीही लागला, तरी पाक ए१ आणि भारत ए२ असा क्रमांक असणार आहे. या दोघांचा सुपर फोरमधील प्रवेश निश्चित समजला जात आहे. त्यानुसार या दोघांमध्ये १० सप्टेंबर रोजीची लढत अपेक्षित आहे.

वेळापत्रक

  • ३० ऑगस्ट ः पाकिस्तान वि. नेपाळ (मुलतान)

  • ३१ ऑगस्ट ः बांगलादेश वि. श्रीलंका (कँडी)

  • २ सप्टेंबर ः भारत वि. पाक (कँडी)

  • ३ सप्टेंबर ः बांगलादेश वि. अफगाणिस्तान (लाहोर)

  • ४ सप्टेंबर ः भारत वि. नेपाळ (कँडी)

  • ५ सप्टेंबर ः अफगाणिस्तान वि. श्रीलंका (लाहोर)

सुपर फोर

  • ६ सप्टेंबर ः ए१ वि. बी२ (लाहोर)

  • ९ सप्टेंबर ः बी१ वि. बी२ (कोलंबो)

  • १० सप्टेंबर ः ए१ वि. ए२ (कोलंबो)

    (ही लढत भारत-पाक असू शकेल.)

  • १२ सप्टेंबर ः ए२ वि. बी१ (कोलंबो)

  • १४ सप्टेंबर ः ए१ वि. बी१ (कोलंबो)

  • सप्टेंबर १४ ः ए२ वि. बी२ (कोलंबो)

  • अंतिम सामना ः १७ सप्टेंबर (कोलंबो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com