IND vs PAK : भारत भाग्य विधाता... अंगावर शहारे! टीम इंडियासोबत संपूर्ण स्टेडियमने गायले राष्ट्रगीत

IND vs PAK National Anthem
IND vs PAK National Anthem esakal

IND vs PAK : भारतात होत असलेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ एकमेकांना भिडत आहेत. सामन्यापूर्वी वातावरण निर्मितीसाठी बीसीसीआयने एक कार्यक्रम देखील आयोजित केला होता. मात्र या कार्यक्रमकाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले नाही. त्यामुळे टेलिव्हिजनवर सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांची थोडी निराशा झाली.

मात्र भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकताच ही निराशा दूर झाली. त्यानंतर मैदानावर दोन्ही देशांचे राष्ट्रगीत गाण्यात आले. पहिल्यांदा पाकिस्तानचे राष्ट्रगीत झाले त्यानंतर भारताचे राष्ट्रगीत सुरू होतात संपूर्ण स्टेडियम उभे राहिले आणि आपल्या लाडक्या संघासोबत त्यांनी राष्ट्रगीत म्हणत त्यांना प्रोत्साहन दिले. ही दृष्ये पाहताना सर्वांच्या अंगावर शहारे उभे राहिले.

IND vs PAK National Anthem
IND vs PAK CWC 2023 LIVE : पाकिस्तानची आक्रमक सुरूवात; सिराजची खराब गोलंदाजी

भारत - पाकिस्तान सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने आपल्या संघात एक बदल केला असून संघात शुभमन गिलचा समावेश करण्यात आला आहे. तो डेंग्यूमुळे आजारी होता.

मात्र गुजरात टायटन्सचा हा सलामीवीर नरेंद्र मोदी स्टेडियमवर आपला वनडे वर्ल्डकपमधील पहिला सामना खेळणार आहे. इथे गिलने दमदार कामगिरी केली आहे.

IND vs PAK National Anthem
Ind vs Pak : मित्रामुळे इशान किशनचा प्लेइंग-11 मधून पत्ता कट, पाकिस्तानविरुद्ध 'या' खेळाडूंना मिळाली संधी

सामन्याबद्दल बोल्याचं झालं तर भारत पाकिस्तान सामना असूनही सुरूवातीच्या फेजमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियम फुल पॅक नव्हते. बऱ्याच सीट या रिकम्या दिसत आहेत. त्यामुळे बीसीसीआय आणि आयसीसीची तिकीट विक्रीची रणनिती फेल गेल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

भारताची प्लेईंग 11 :

शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com