IND vs PAK: एकीकडे कारगिल युद्ध तर दुसरीकडे भारत-पाक सामना, इंडियाने असा घेतला बदला

कारगील युद्धाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यात वातावरण खूपच तणावपूर्ण होतं
IND vs PAK
IND vs PAK

India vs Pakistan : आशिया चषक स्पर्धा तब्बल चार वर्षांनंतर यंदा सुरू झाली आहे. आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठी लढत होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता खेळवला जाणैर आहे. जेव्हा हे दोन संघ आमनेसामने येतात तेव्हा ते सीमेवरील युद्धासारखे असते. भारत-पाकिस्तान सामन्यांच्या इतिहासाशी संबंधित असाच एक किस्सा सांगणार आहोत.

1999 क्रिकेट विश्वचषक क्रिकेटचा जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्लंडमध्ये खेळल्या गेला. हा विश्वचषक अनेक अर्थांनी खास आहे. जेव्हा सीमेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू होते. भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात सीमेवर युद्ध सुरू होते. त्यावेळी पाकिस्तानने काश्मीरमधील उंच शिखरांवर कब्जा केला होता. दुसरीकडे, भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट संघांमध्ये मैदानावर युद्ध सुरू होते.

IND vs PAK
India Vs Pakistan : 'इंदिरा नगर का गुंडा' द्रविड जेव्हा शोएबच्या अंगावर धावून गेला होता

वर्ल्ड कप सुपर सिक्सच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला 227 धावांचे लक्ष्य दिले होते. त्यावेळी 250 वरील लक्ष्य अत्यंत सुरक्षित मानले जात होते. त्या सामन्यात सचिन तेंडुलकरने भारताला झंझावाती सुरुवात करून दिली. त्याने 45 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने 59 धावा केल्या. क्रिकेटची भिंत म्हटल्या जाणाऱ्या राहुल द्रविडने या सामन्यात भारताकडून सर्वाधिक 61 धावांचे योगदान दिले. या फलंदाजांच्या जोरावर भारताने पाकिस्तानला मोठे लक्ष्य दिले.

IND vs PAK
VIDEO | IND vs PAK : सूर्यकुमार यादवच्या 'या' शॉटमुळे पाकिस्तानला फुटला घाम

पाकिस्तानी संघ भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही. पाकिस्तानकडून एकही फलंदाज मोठी खेळी खेळू शकला नाही आणि पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या 180 धावांत ऑलआऊट झाला आणि त्यामुळे भारताने हा सामना 47 धावांनी जिंकला. त्या सामन्यात भारतासाठी व्यंकटेश प्रसादने किलर गोलंदाजी केली. त्याने 5 विकेट घेतल्या. त्याची गोलंदाजी पाहून पाकिस्तानी फलंदाजांनी दाताखाली बोटे दाबली. तो टीम इंडियाचा सर्वात मोठा सामना विजेता म्हणून उदयास आला. त्याचवेळी अनिल कुंबळेच्या खात्यात दोन विकेट गेल्या. या गोलंदाजांमुळेच भारतीय संघाला विजय मिळवता आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com