VIDEO | India Vs Pakistan : शोएबचे दादाच्या बरगड्या होते टार्गेट; पाहा पुढे काय झालं

India Vs Pakistan Shoaib Akhtar Broke Ribs Of Sourav Ganguly During 1999 Mohali Match
India Vs Pakistan Shoaib Akhtar Broke Ribs Of Sourav Ganguly During 1999 Mohali Match esakal

India Vs Pakistan Shoaib Akhtar Sourav Ganguly : भारत आणि पाकिस्तान गेल्या वर्षी झालेल्या टी 20 वर्ल्डकपनंतर पहिल्यांदाच आशिया कपमध्ये 28 ऑगस्टला भिडणार आहेत. भारत पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे हाय व्होल्टेज ड्रामा आणि भावनिकतेचा महापूर असतो. स्टार स्पोर्ट्सवर अशात इतिहासातील भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान घडलेल्या काही किस्से आठवले जात आहेत. असाच एक किस्सा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि विरेंद्र सेहवागने सांगितला. हा किस्सा भारतीय क्रिकेटमधाला 'दादा' सौरभ गांगुली आणि त्याच्या बरगड्यांविषयी आहे.

India Vs Pakistan Shoaib Akhtar Broke Ribs Of Sourav Ganguly During 1999 Mohali Match
India Vs Pakistan : 'इंदिरा नगर का गुंडा' द्रविड जेव्हा शोएबच्या अंगावर धावून गेला होता

शोएब अख्तरने विरेंद्र सेहवाग सोबत मोहालीत झालेल्या 1999 च्या सामन्यातील एक प्रसंग शेअर केला. शोएब अख्तर म्हणाला, 'आम्ही आमच्या टीम मिटिंगमध्ये सौरभ गांगुलीच्या बरगड्यांना टार्गेट करण्याचे ठरवले होते. यावेळी मी कशा प्रकारे गांगुलीच्या बरगड्यांच्या दिशेने गोलंदाजी करायची हे सांगण्यात आले. त्यावेळी मी टीम मिटिंगमध्ये विचारले की मी त्याला बाद करण्याचा प्रयत्न करायचा नाही? त्यांनी सांगितले की नाही तुझ्याकडे चांगला वेग आहे. तू फक्त फलंदाजाच्या बॉडी लाईनने गोलंदाजी करायचीस आम्ही विकेट घेण्याची जबाबदारी आमची.'

India Vs Pakistan Shoaib Akhtar Broke Ribs Of Sourav Ganguly During 1999 Mohali Match
Virender Sehwag : आफ्रिदी अपमान करत होता, सचिन अख्तरला ठोकत होता; सेहवागने सांगितला 19 वर्षापूर्वीचा किस्सा

मोहालीमधील 1999 च्या सामन्यात शोएब अख्तरचा एक उसळता चेंडू सौरभ गांगुलीच्या बरगड्यांना जावून लागला होता. त्यावेळी त्याला मैदानाबाहेर घेऊन जावे लागले होते. त्यानंतर तो सामन्यात पुन्हा फलंदाजीला उतरला नव्हता. नंतर शोएब अख्तर सौरभ गांगुली बाबत नेहमी सांगत राहिला की सौरभ गांगुली हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात धाडसी सलामीवीर होता. जरी सौरभ गांगुलीला अखुड टप्प्याचे चेंडू खेळण्यात अडचणी येत असल्या तरी तो नेटाने फलंदाजी करत धावा करायचा.

शोएब अख्तरने 2020 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, 'लोक सौरभ गांगुलीबद्दल तो वेगवान गोलंदाजीचा सामना करताना घाबरतो, तो मला घाबरतो असे म्हणायचे. मला असे वाटते की ते साफ चुकीचे आहे. सौरभ गांगुली हा मी गोलंदाजी केलेला सर्वात धाडसी फलंदाज होता. तो एकमेव सलामीवीर होता ज्याने नवीन चेंडूवर माझा सामना केला होता.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com