IND vs SA T20 : अर्शदीपच्या गोलंदाजीनंतर सूर्या तळपला, मालिकेची विजयी सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs SA T20 Live

IND vs SA T20 : अर्शदीपच्या गोलंदाजीनंतर सूर्या तळपला, मालिकेची विजयी सुरुवात

India vs South Africa Live Score 1st T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा आठ गडी राखून पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 8 गडी गमावून 106 धावा केल्या. केशव महाराज यांनी सर्वाधिक 41 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी अर्शदीप सिंगने तीन विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात भारताने लक्ष्याचा पाठलाग 16.4 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात केला. सूर्यकुमार 33 चेंडूत 50 आणि केएल राहुल 56 चेंडूत 51 धावांवर नाबाद राहिला.

राहुल आणि सूर्यकुमार प्रभारी

12 षटकांनंतर भारताने 2 गड्यांच्या मोबदल्यात 66 धावा केल्या. सध्या सूर्यकुमार यादव 20 चेंडूत 26 आणि केएल राहुल 41 चेंडूत 31 धावा करत फलंदाजी करत आहे. भारताला आता 48 चेंडूत 41 धावांची गरज आहे.

रोहित शर्मानंतर कोहलीही आऊट; मात्र सूर्यकुमार यादव आक्रमण

भारताला दुसरा धक्का सातव्या षटकात बसला आहे. एनरिक नॉर्टजेने विराट कोहलीला यष्टिरक्षक झेलबाद केले आहे. कोहलीला नऊ चेंडूत तीन धावा करता आल्या. तत्पूर्वी रोहित शर्मा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला होता. सूर्यकुमार यादवने मैदानात येताच लागोपाठ दोन षटकार ठोकले.

रबाडाने भारताला दिला पहिला धक्का; कर्णधार रोहित शर्मा शून्यावर आऊट

तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कागिसो रबाडाने कर्णधार रोहित शर्माला झेलबाद केले. रोहित शर्माला खातेही उघडता आले नाही. तीन षटकांनंतर भारताने एका विकेटच्या मोबदल्यात 11 धावा केल्या होत्या. सध्या विराट कोहली दोन आणि केएल राहुल क्रीजवर आहे.

भारताच्या डावाला सुरुवात; रोहित-राहुल मैदानावर 

भारतीय डाव सुरू झाला आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल ही भारतीय सलामीची जोडी मैदानात आली आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी पहिले षटक टाकायला आलेल्या रबाडाने या षटकात भारतीय फलंदाजांना एकही धाव काढू दिली नाही. त्याने हे ओव्हर मेडन टाकले.

दक्षिण आफ्रिकेला 101 धावांवर आठवा धक्का, महाराज 41 धावांवर बाद

अक्षरने दक्षिण आफ्रिकेला दिला सातवा धक्का

दक्षिण आफ्रिकेला 16व्या षटकात 68 धावांवर सातवा धक्का बसला आहे. अक्षर पटेलने वेनला झेलबाद केले. वेन 37 चेंडूत 24 धावा काढून बाद झाला. त्याने आपल्या डावात एक चौकार आणि एक षटकार ठोकला. वेनने केशव महाराजसोबत सातव्या विकेटसाठी 47 चेंडूत 26 धावांची भागीदारी केली. सध्या महाराज आणि कागिसो रबाडा क्रीजवर आहेत.

दक्षिण आफ्रिकेला आठव्या षटकात सहावा धक्का

दक्षिण आफ्रिकेला आठव्या षटकात 42 धावांवर सहावा धक्का बसला आहे. हर्षल पटेलने पहिल्याच षटकात एडन मार्करम अल्बडब्‍ल्‍यू आउट केले. मार्करमला 24 चेंडूत 25 धावा करता आल्या. मार्करमने आपल्या खेळीत तीन चौकार आणि एक चौकार मारला. यानंतर नवव्या षटकात अश्विनने मेडन षटक टाकले. नऊ षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची 6 बाद 42 धावा. वेन पारनेल आणि केशव महाराज सध्या क्रीजवर आहेत.

पॉवरप्ले भारताच्या नावावर

पॉवरप्ले भारताच्या नावावर राहिला आहे, कारण या सहा षटकात दक्षिण आफ्रिकेला केवळ 30 धावा करता आल्या आणि त्यांचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या षटकात पाचवा धक्का बसला. दीपक चहरने ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर त्रिस्टन स्टब्सला अर्शदीप सिंगकडे झेलबाद झाला. दक्षिण आफ्रिकेच्या चार खेळाडूंना खातेही उघडता आले नाही. तीन षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेच्या 5 बाद 14 धावा आहेत. वेन पारनेल आणि एडन मार्कराम सध्या क्रीजवर आहेत.

दुसऱ्या षटकात दक्षिण आफ्रिकेला तीन धक्के

दुसऱ्या षटकात दक्षिण आफ्रिकेला आणखी तीन धक्के बसले आहे. दीपक चहरनंतर अर्शदीप सिंगने धुमाकूळ घालत सहा चेंडूंत तीन विकेट घेतले आहेत. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अर्शदीपने क्विंटन डी कॉकला क्लीन बोल्ड केले. यानंतर पाचव्या चेंडूवर अर्शदीपने रिले रुसोला यष्टिरक्षक ऋषभ पंतकडे झेलबाद केले. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर अर्शदीपने डेव्हिड मिलरला क्लीन बोल्ड केले. दोन षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची अवस्था चार बाद आठ आहे.

पहिल्याच षटकात दक्षिण आफ्रिकेला धक्का

पहिल्याच षटकात एका धावसंख्येवर दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज दीपक चहरने ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर कर्णधार टेंबा बावुमाला क्लीन बोल्ड केले.

टीम इंडीयाच्या प्लेंइग 11

भारतीय : रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, आर अश्विन, दीपक चहर.

भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा घेतला निर्णय

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंत आणि अर्शदीपला संधी मिळाली आहे. त्याचवेळी जसप्रीत बुमराह अनफिट आहे. त्यांच्या जागी दीपक चहरला संधी देण्यात आली आहे. युझवेंद्र चहलही हा सामना खेळत नाही. त्याच्या जागी रविचंद्रन अश्विनचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे.

पहिल्या T20 मध्ये प्लेइंग-11 कसा असेल?

IND vs SA: टीम इंडीयाच्या प्लेंइग 11मध्ये मोठा फेरबदल, 'या' खेळाडूला मिळू शकते संधी - संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा