रहाणे-पुजारा जोडी जमली; दुसऱ्या दिवसाखेर टीम इंडियाकडे आघाडी | India vs South Africa 2nd Test Day 2 India Bowling | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RSA vs IND
RSAvsIND Live: गोलंदाजांसाठी पहिले सत्र महत्वाचे

रहाणे-पुजारा जोडी जमली; दुसऱ्या दिवसाखेर टीम इंडियाकडे आघाडी

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेनं घेतलेली अल्प आघाडी भेदून टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाअखेर 58 धावांची आघाडी घेतली आहे. लोकेश राहुल (KL Rahul) 8 (21) आणि मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) 23 (37) धावा करुन परतल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी तिसऱ्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली आहे. दुसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने 2 बाद 85 धावा केल्या असून चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 35 (42) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 11 (22) धावांवर नाबाद खेळत होते.

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांसाठी पहिले सत्र महत्वाचे असणार आहे. पहिल्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या भेदक माऱ्यासमोर भारताला 202 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताला विराट कोहलीची (Virat Kohli) उणीव जाणवली.

भारताचा पहिला डाव स्वस्तात आटोपल्यानंतर भारतीय गोलंदाज (Indian Bowlers) दक्षिण आफ्रिकेचाही डाव लवकर संपवतील असे वाटत होते. मात्र पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवस अखेर 1 बाद 35 धावांपर्यंत मजल मारली होती. खेळ संपला त्यावेळी कर्णधार डीन एल्गर 11 तर कीगन पिटरसन 14 धावा करुन नाबाद होते.

भारताला आता दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात चांगला मारा करत विकेट घेणे गरजेचे आहे. त्यामुळे भारतासाठी पहिले सत्र महत्वाचे असणार आहे. (India vs South Africa 2nd Test Day 2 Live Update Score)

 • 44-2 : मयांकच्या रुपात दुसरा सलामीवीर देखील तंबूत, ओलिव्हरनं 23 धावांवर त्याला तंबूत धाडले

 • 24-1 : मार्कोनं टीम इंडियाला दिला मोठा धक्का, लोकेश राहुल 21 चेंडूत 8 धावांची खेळी करुन माघारी

दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 229 धावांत आटोपला असून त्यांनी पहिल्या डावात 27 धावांची अल्प आघाडी घेतली आहे.

 • 229-10 : ठाकूरची सातवी विकेट, लुंगी एनिग्डीला खातेही उघडता आले नाही

 • 228-9 : शार्दुल ठाकूरनं मोर्कोचा 21 धावांवर धाडले तंबूत

 • 217-8 : केशव महाराजला बुमराहनं दाखवला तंबूचा रस्ता, त्याने 29 चेंडूत उपयुक्त अशा 27 धावा केल्या.

 • 179-7 : मोहम्मद शमीनं रबाडाला खातेही उघडून दिले नाही, तो सिराजच्या हाती झेल देऊन परतला

 • 177-6 : टेम्बा बवुमा अर्धशतकानंतर माघारी, शार्दुलच्या गोलंदाजीवर पंतचा अप्रतिम झेल, या विकेटसह शार्दुल ठाकूरनं पाच विकेट्सचा पल्ला गाठला

 • 162-5 : कायल वेरेनचा 72 चेंडूचा संघर्ष संपला, ठाकूरना 21 धावांवर दाखवला तंबूचा रस्ता

 • टेम्बा बाऊमा आणि कायल वेरेनकडून दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरण्यास सुरुवात

 • 102-4 : शार्दूल ठाकूरला आणखी एक यश, दुसेन अवघ्या एका धावेवर तंबूत

 • शार्दुल ठाकूरचा आफ्रिकेला दुसरा धक्का, सेट झालेला पिटरसन 62 धावांवर बाद

 • पिटरसनचे दमदार अर्धशतक, दक्षिण आफ्रिकेची शंभरी पार

 • शार्दुल ठाकूर पुन्हा आला भारताच्या मदतीला, डीन एल्गरला 28 धावांवर केले बाद

 • दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या दिवशी पहिला डाव 1 बाद 35 धावांपासून सुरु

 • भारतासाठी पहिले सत्र असणार महत्वाचे

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top