esakal | IND vs SL 1st ODI: 'मुंबई इंडियन्स'च्या दोघांना पदार्पणाची संधी
sakal

बोलून बातमी शोधा

Shikhar-Dhawan-Team-India

IND vs SL 1st ODI: 'मुंबई इंडियन्स'च्या दोघांना पदार्पणाची संधी

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई इंडियन्सचे दोन जण करणार वन डे पदार्पण; पाहा 'टीम गब्बर'ची Playing XI

India vs Sri Lanka 1st ODI कोलंबो: भारतीय संघाची तरूण, तडफदार टीम आज कोलंबोच्या मैदावर डावखुरा सलामीवीर शिखर धवन यांच्या नेतृत्वाखाली वन डे मालिका खेळण्यास सुरूवात करत आहेत. पहिल्या सामन्यान यजमान श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने संघात युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या दोघांनाही संधी दिली. तसेच, हार्दिक आणि कृणाल पांड्या बंधूंनाही संघात स्थान देण्यात आले आहे. भारताचा दुसरा संघ विराटच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये आहे. त्यामुळे श्रीलंकेतील वन डे मालिकेत तरूणाईचा कोणता खेळाडू चमकतो, यावर साऱ्यांचेच लक्ष आहे.

पाहा कसे आहेत दोन्ही संघ-

टीम इंडिया- शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, इशान किशन, मनिष पांडे, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, दिपक चहर, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), युजवेंद्र चहल, कुलदीप यादव

श्रीलंकेचा संघ- डब्ल्यू फर्नांडो, एम भानुका, बी राजपक्षे, डी डी सिल्वा, सी असलांका, डी शनाका, डब्ल्यू हसरंगा, सी करुणारत्ने, इसरू उडाना, डी चमीरा, लक्षन संदाकन

मुंबई इंडियन्सच्या दोन खेळाडूंना वन डेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. सूर्यकुमार यादवला संघात स्थान मिळाले आहेत. तो आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळतो आहे. तर बर्थडे बॉय इशान किशनलादेखील पदार्पणाची संधी मिळाली आहे.

द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया मैदानात!

Rahul Dravid

Rahul Dravid

संघनिवड आणि तब्बल ३३ दिवसांच्या कालावधीनंतर शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज मैदानात उतरला. भारताच्या दुसऱ्या फळीचा हा संघ असला तरी श्रीलंकेवर भारी ठरण्याची क्षमता बाळगून आहे. भारत-श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहे.

loading image