IND vs SL 1st T20 : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताचा फक्त 2 धावांनी विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs Sri Lanka 1st T20I
Live

IND vs SL 1st T20 : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताचा फक्त 2 धावांनी विजय

India vs Sri Lanka 1st T20I : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिलाच सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. अखेरच्या चेंडूवर अक्षर पटेलने फक्त 1 धाव दिल्यामुळे भारताने सामना अवघ्या 2 धावांनी जिंकत नव्या वर्षाची सुरूवात विजयाने केली. भारताने श्रीलंकेसमोर 163 धावांचे आव्हान ठेवले होते. लंकेला 160 धावा करता आल्या. भारताकडून शिवम मावीने प्रभावी मारा करत 4 षटकात 22 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.

भारताकडून उमरान मलिकनेही मोक्याच्या क्षणी विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने लंकेचा झुंजार कर्णधार शानकाला 45 धावांवर बाद केले. तेथूनच भारताने सामन्यावर पकड मजबूत केली.

तत्पूर्वी, श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्याच सामन्यात भारताची अवस्था 5 बाद 94 धावा अशी झाली असताना दीपक हुड्डाने (नाबाद 41 धावा) झुंजार खेळी करत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. त्याने अक्षर पटेलच्या (नाबाद 31 धावा) साथीने सहाव्या विकेटसाठी 35 चेंडूत नाबाद 68 धावांची धडाकेबाज भागीदारी रचली. यामुळे 15 व्या षटकात 5 बाद 94 अशी अवस्था झालेल्या भारताने 20 षटकात 5 बाद 162 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून इशान किशननेही 37 तर कर्णधार हार्दिक पांड्याने 29 धावांचे योगदान दिले.

01:12 PM,  Jan 03 2023

श्रीलंकेने नाणेफेक जिंकली

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

01:12 PM,  Jan 03 2023

भारताकडून इशान किशन शुभमन गिल देणार सलामी

भारताने पहिल्या सामन्यासाठी शुभमन गिल आणि शिवम मावी यांना पदार्पणाची संधी दिली आहे. शुभमन गिल हा इशान किशन सोबत सलामी देईल तर शिवम मावीला अर्शदीप सिंग निवडीसाठी उपलब्ध नसल्याने संधी मिळाली आहे.

01:39 PM,  Jan 03 2023

पहिल्याच षटकात इशान किशनचा धमाका

सलामीवीर इशान किशनने श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्याच सामन्याच्या पहिल्या षटकात धमाका केला. त्याने 2 चौकार आणि 1 षटकार मारत रजिताला 17 धावा चोपल्या.

01:48 PM,  Jan 03 2023

भारताला पहिला धक्का

श्रीलंकेच्या तीक्षाणाने भारताला पॉवर प्लेच्या तिसऱ्याच षटकात पहिला धक्का दिला. त्याने टी 20 पदार्पण करणाऱ्या शुभमन गिलला 7 धावांवर बाद केले.

02:15 PM,  Jan 03 2023

46-3 : सूर्याचा प्रयत्न फसला

शुभमन गिल बाद झाल्यानंतर भारताची धावगती थोडी मंदावली. दरम्यान, सूर्यकुमार यादवने धावगती वाढवण्यासाठी एक स्कूप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न फसला आणि सूर्या 7 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या संजू सॅमसनला देखील 5 धावा करून बाद झाला.

02:33 PM,  Jan 03 2023

77-4 : हसरंगाने दिला मोठा धक्का

हार्दिक पांड्या आणि इशान किशनने चौथ्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र हसलंगाने इशान किशनला 37 धावांवर बाद करत भारताला मोठा धक्का दिला.

03:13 PM,  Jan 03 2023

94-5 : कर्णधारानेही सोडली साथ

हार्दिक पांड्या 29 धावा करून बाद

03:36 PM,  Jan 03 2023

हुड्डा - पटेलने लाज वाचवली

15 व्या षटकात अवघ्या 94 धावांवर भारताचा निम्मा संघ माघारी गेल्यानंतर दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांनी सहाव्या विकेटसाठी 35 चेंडूत नाबाद 68 धावांची भागीदारी रचत भारताला 20 षटकात 5 बाद 162 धावांपर्यंत पोहचवले.

03:36 PM,  Jan 03 2023

12-1 : शिवम मावीचे दमदार पदार्पण 

भारताकडून टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शिवम मावीने आपल्या पहिल्याच षटकात पथूम निसंकाचा 1 धावेवर त्रिफळा उडवला.

03:39 PM,  Jan 03 2023

24-2 : शिवम मावीने दिला दुसरा धक्का

शिवम मावीने धनंजया डे सिल्वाला 8 धावांवर बाद करत श्रीलंकेला दुसरा धक्का दिला.

04:27 PM,  Jan 03 2023

68-5 : हर्षल पटेल, उमरान मलिकचा प्रभावी मारा

सामन्याच्या मधल्या षटकात भारताच्या उमरान मलिक, हर्षल पटेल यांनी प्रभावी मारा करत लंकेच्या तीन विकेट घेतल्या उमरानने चरीथ असलंकाला 12 धावांवर तर हर्षल पटेलने कुसल मेंडीस (28) आणि भानुका राजपक्षे (10) या दोघांना माघारी धाडले.