India Playing XI : रोहित संघ बदलण्याचं धाडस करणार; इशान - सूर्याबाबत घेणार मोठा निर्णय? | IND vs SL 2nd ODI | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India Playing XI IND vs SL 2nd ODI Suryakumar Yadav Ishan Kishan

India Playing XI IND vs SL 2nd ODI : रोहित संघ बदलण्याचं धाडस करणार; इशान - सूर्याबाबत घेणार मोठा निर्णय?

India Playing XI IND vs SL 2nd ODI : भारताने श्रीलंकेविरूद्धचा पहिला वनडे सामना 67 धावांनी जिंकला. भारत तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 ने अघाडीवर आहे. पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने सलामीला इशान किशनच्या ऐवजी शुभमन गिलला संधी दिली होती. तर मध्यल्या फळीत सूर्यकुमार यादवला डावलून केएल राहुलला संघात स्थान दिले होते. आता दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा आपल्या विनिंग कॉम्बिनेशनमध्ये काही बदल करतो का? इशान किशन आणि सूर्यकुमार यादवला संधी देतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

IND Vs SL 2nd ODI: संघनिवडीवेळी काय होईल?

- रोहित शर्मा - शुभमन गिलच सलामीला येतील. दोघांनीही पहिल्या सामन्यात 143 धावांची सलामी दिली. गिलने 70 धावा केल्या.

- रोहित शर्मा सूर्यापेक्षा श्रेयस अय्यरला त्याचा यामागील फॉर्म पाहून संधी देण्याची शक्यता आहे.

- केएल राहुल विकेट किपिंग करत असल्याने तो आली प्लेईंग 11 मधील जागा कायम राखेल.

- रोहित अक्षर पटेलला बाहेर ठेवून वॉशिंग्टन सुंदरला खेळवण्याची शक्यताही नाही.

- मात्र युझवेंद्र चहलच्या जागी अष्टपैलू म्हणून सुंदरला खेळवण्याची एक शक्यता आहे.

- मोहम्मद सिराज आणि उमरान मलिकने आपल्या गोलंदाजीने प्रभावित केल्याने ते संघातील जागा कायम राखतील.

- अर्शदीप सिंगला संधी मिळण्यासाठी अजून वाट पहावी लागणार आहे.

दुसऱ्या वनडेसाठी भारताची प्लेईंग 11

रोहित शर्मा

शुभमन गिल

विराट कोहली

श्रेयस अय्यर

केएल राहुल

हार्दिक पांड्या

अक्षर पटेल

मोहम्मद शमी

मोहम्मद सिराज

उमरान मलिक

युझवेंद्र चहल

भारताचा श्रीलंकेविरूद्धच्या वनडे मालिकेसाठीचा संघ : रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग

(Sports Latest News)

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?