IND vs WI 2nd ODI : प्रसिद्ध कृष्णाचा चौका; अन् बरंच काही

India vs West Indies, 2nd ODI Live Updates
India vs West Indies, 2nd ODI Live UpdatesSakal

अहमदाबाद: सुर्यकुमार यादवचं अर्धशतक आणि लोकेश राहुल याच्या 49 धावाच्या जोरावर टीम इंडियाने पाहुण्या वेस्ट इंडीजसमोर 238 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना प्रसिद्ध कृष्णाने कॅरेबियन गोलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले. त्याने चार विकेट्स घेत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. प्रसिद्ध कृष्णाने 9 षटकात 12 धावा खर्च करून 4 गडी बाद केले.

रोहित शर्मा, रिषभ पंत आणि विराट कोहली स्वस्तात माघारी फिरल्यानंतर राहुल-पंत जोडीनं चौथ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. ही जोडी भारतीय संघासाठी शतकी भागीदारी करुन आणखी मजबूत स्थितीत घेऊन जाईल असे वाटत होते. पण लोकेश राहुल धावबाद झाला. त्याने 49 धावा केल्या. सुर्यकुमार यादवने भारताकडून सर्वाधिक 64 धावांची खेळी केली. वाशिंग्टन सुंदर 24 आणि दीपक हुड्डाने अखेरच्या षटकात 29 धावा करुन संघाची धावसंख्या वाढवण्यात मोलाच योगदान दिले.

भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताचा अव्वल फलंदाज केएल राहुल (KL Rahul) याने संघात पुनरागमन केले. ईशान किशनच्या जागी त्याला संघात घेण्यात आले होते.

भारताने पहिली वनडे 6 विकेट्स राखून जिंकत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आजचा दुसरा सामना जिंकून भारत मालिका खिशात घालण्याच्या तयारीत असेल. तर वेस्ट इंडीजला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी आजचा सामना जिंकणे गरजेचेच आहे.

  • 193-10 : पहिली विकेट घेणाऱ्या प्रसिद्ध कृष्णानंच घेतली शेवटची विकेट, टीम इंडियाने 44 धावांनी सामना जिंकत मालिका 2-0 अशी जिंकली

  • 193-9 : ओडसीन स्मिथच्या रुपात वेस्ट इंडीजने गमावली आणखी एक विकेट, वाशिंग्टन सुंदरला यश

  • 159-8 : शार्दुल ठाकूरनं हुसैनचा काढला काटा, त्याने 52 चेंडूत 34 धावा केल्या

  • 159-7 : फेबिन एलनच्या रुपात सिराजला यश, त्याने 22 चेंडूत 13 धावा केल्या

  • 117-6 : शमर्थ ब्रुक्सच्या खेळीला ब्रेक; दीपक हुड्डानं 44 धावांवर धाडलं तंबूत

  • 76-5 : कॅरेबियनचा अर्धा संघ तंबूत, शार्दुल ठाकूरनं जेसन होल्डरला 2 धावांवर धाडले माघारी

  • 66-4 : प्रसिद्ध कृष्णाला तिसरे यश; कर्णधार निकोलस पूरन तंबूत परतला

  • 52-3 : चहलच्या फिरकीतील जादूही दिसली, शाय होपला 27 धावांवर धाडले माघारी

  • 38-2 : प्रसिद्ध कृष्णाच्या खात्यात आणखी एक विकेट; डेरेन ब्रावो अवघ्या एका धावेवर तंबूत

  • 32-1 : प्रसिद्ध कृष्णानं ब्रँडम किंगच्या 18 (20) रुपात वेस्ट इंडिजला पहिला दणका

भारतीय संघाने निर्धारित 50 षटकात 9 बाद 237 धावा केल्या आहेत.

  • 226-9 : होर्ल्डरन दीपक हुड्डाच्या रुपात महत्त्वपूर्ण विकेट घेतली. दीपकनं 25 चेंडूत उपयुक्त 29 धावांची खेळी केली

  • 224-8 : मोहम्मद सिराजच्या रुपात टीम इंडियाला आणखी एक धक्का, अल्जारीच्या खात्यात जमा झाली विकेट

  • 212-7 : अल्झारी जोसेफनं शार्दुल ठाकूरला धाडलं तंबूत

  • 192-6 : उत्तुंग फटका मारण्याच्या नादात वाशिंग्टन 24 (41) बाद, हुसेनला मिळाले यश

  • 177-5 : एलननं टीम इंडियाला दिला मोठा धक्का, सुर्यकुमार यादव 83 चेंडूत 64 करुन झेलबाद

  • 134-4 : जमलेली जोडी फुटली, सुर्या-लोकेश राहुल यांच्यातील ताळमेळ ढासलला आणि राहुलच्या 49 (48) रुपात टीम इंडिला बसला चौथा धक्का

  • 43-3 विराट कोहलीही 18 (30) माघारी, स्मिथला आणखी एक यश

  • 39-2 रिषभ पंतच्या रुपात स्मिथनं संघाला मिळवून दिले दुसरे यश, पंतनं 34 चेंडूत काढल्या 18 धावा

  • 9-1 भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा 5 धावा करून बाद

  • रोहित शर्माचा धक्का, ऋषभ पंत आला सलामीला

  • भारतीय संघात एक बदल, किशनच्या जागी केएल राहुलला संधी

  • वेस्ट इंडीज संघाने नाणेफेक जिंकली; प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com