IND vs WI : "विराट कोहलीनं ब्रेक घ्यावा"

Virat Kohli
Virat Kohliesakal

Virat Kohli, IND Vs WI : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा वनडे सामना 9 फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या मालिकेत पहिल्यांदाच विराट कोहली रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. पहिल्या वनडेत विराट कोहलीने दोन खणखणीत चौकार मारुन मोठी दमदार खेळीसाठी आतूर असल्याची झलक दाखवली. पण या दोन चौकाराच्या मदतीने केलेल्या 8 धावा करुनच तंबूत परतला.

वेस्ट इंडीज (West Indies) विरुद्धच्या फ्लॉप शोनंतरही विराट कोहलीने (Virat Kohli) खास विक्रम आपल्या नावे केला. त्याने मायदेशातील वनडेत 5000 धावांचा पल्ला पार केला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मायदेशात 48.11 च्या सरासरीनं 6976 धावा केल्या आहेत. विराट कोहलीचं तमाम चाहते त्याच्या शतकाची प्रतिक्षा करत असताना कोहली मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरताना दिसतोय. त्याच्या या कामगिरीवर बीसीसीआयचे माजी निवड समिती सदस्य आणि यष्टीरक्षक साबा करीम यांनी मोठ वक्तव्य केले आहे.

Virat Kohli
पहिल्या वनडेत विराटचा फ्लॉप शो तरी '5 हजारी मनसबदारी'

सध्याच्या परिस्थितीत कोणती गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे ते फक्त विराट कोहलीलाच माहिती आहे. तो त्याच्या प्लॅननुसार पुढे जात आहे. जर त्याला वाटत असेल की थोडा ब्रेक घ्यावा तर त्याने त्यासंदर्भात विचार करायला काहीच हरकत नाही, असे मत साबा करीम यांनी व्यक्त केले आहे. ते पुढे म्हणाले, वेस्ट इंडीज विरुद्धच्या पहिल्या वनडेत विराट ज्या पद्धतीने बाद झाला ते पटण्याजोगे नाही. कोहली नेहमी योग्य दिशेनं फलंदाजी करताना पाहायला मिळते. ती गोष्ट वेस्ट इंडीज विरुद्ध दिसली नाही. तो शॉट बॉलवर अशा पद्धतीने बाद होत नाही, असा दाखलाही साबा करीम यांनी दिला. वेस्ट इंडीजच्या गोलंदाजाने शॉट बॉल टाकून कोहलीसाठी जाळे विणले होते. कोहली त्यात सहज फसला. त्याचा फोकस नव्हता त्यामुळे त्याला तंबूत परतावे लागले, असेही ते म्हणले आहेत.

Virat Kohli
VIDEO : "उल्टा वाला डाल..." कोहली-चहलच्या प्लॅनवर पोलार्ड फसला!

पहिल्या वनडेत कोहली फक्त 4 बॉलच खेळला

वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात भारतीय सलामी जोडीनं पहिल्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी रचली होती. रोहित बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानात उतरला. त्याने पहिल्या दोन चेंडूत दोन खणखणीत चौकार मारले. पण चौथ्या चेंडूवर तो बाद झाला. भारतीय संघाला अल्प धावांचा पाठलाग करायचा होता. संघावर कोणताही दबाव नसताना विराट कोहलीने अशा प्रकारे विकेट फेकणं अशोभनिय असेच होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com