India Tour of West Indies : कसोटी मालिकेत 'या' 4 खेळाडूंवर दबाव, फ्लॉप झाल्यास BCCI देणार नारळ

Team-India
Team-IndiaSAKAL

India Tour of West Indies : वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आणि वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. या दोन्ही मालिकांमध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव यांचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारताला दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळायचे आहेत.

Team-India
Team India : रोहित शर्माच्या 'या' आवडत्या खेळाडूची कारकीर्द अजिंक्य रहाणेने केली उद्ध्वस्त

भारताच्या विंडीज दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने होणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघाला कसोटीत नवी सुरुवात करायची आहे. या कसोटी मालिकेत सहभागी होणाऱ्या काही भारतीय खेळाडूंवर चांगली कामगिरी करण्याचे दडपण असेल. कारण अनेक खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असून ते संधीची वाट पाहत आहेत. या मालिकेत जर या खेळाडूने चांगली कामगिरी न केल्यास कसोटी संघातून वगळले जाऊ शकते.

Team-India
Team India : टीम इंडियातून हकालपट्टीनंतर पुजाराचा 9 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल! BCCI वर साधला निशाणा

रोहित शर्मा : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील पराभवानंतर रोहित शर्मा टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. रोहित शर्माला कसोटी मालिकेत कर्णधारपदासह फलंदाजीतही चांगली कामगिरी करावी लागणार आहे. डॉमिनिका आणि पोर्ट ऑफ स्पेन येथे होणार्‍या कसोटीत रोहितने कोणतीही मोठी खेळी न खेळल्यास बीसीसीआयवर कठोर निर्णय घेण्याचे दडपण नक्कीच असेल.

Team-India
Wi vs Ind : टीम इंडियातून डच्चू मिळाल्यावर कशी आहे पुजाराची मानसिक स्थिती? वडिलांनी केला मोठा खुलासा

केएस भरत : निवडकर्त्यांनी पुन्हा एकदा यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतवर विश्वास दाखवला आहे. या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भरतला केवळ 8, 6, 23*, 17, 3 आणि 44 धावा करता आल्या. त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही त्याच्या बॅटमधून केवळ 28 धावा निघाल्या. अशा स्थितीत केएस भरतला कसोटी मालिकेत फलंदाजीत चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

Team-India
WI vs IND : रहाणेला उपकर्णधार बनवण्यावरून झाला मोठा गोंधळ, BCCI ला घेतले धारेवर

नवदीप सैनी : उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी दोन वर्षांनंतर कसोटी संघात परतला आहे. 30 वर्षीय नवदीपने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना जानेवारी 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन मैदानावर खेळला होता. नवदीपकडे स्वत:ला सिद्ध करण्याची उत्तम संधी आहे. त्याला कसोटी संघातील स्थान टिकवायचे असेल, तर त्याला या मालिकेत चांगला खेळ दाखवावा लागेल.

Team-India
WI vs IND : BCCI ने काढून घेतली टेस्ट जर्सी, सूर्याने 'या' संघाकडे खेळण्याचा घेतला निर्णय

जयदेव उनाडकट : डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बांगलादेश दौऱ्याद्वारे भारतीय कसोटी संघात पुनरागमन केले. जयदेवने त्या दौऱ्यात एका कसोटी सामन्यात भाग घेतला होता, तरीही या सौराष्ट्राच्या क्रिकेटपटूला एकही सामना खेळायला मिळालेला नाही. विंडीज दौऱ्यावर मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत जयदेव उनाडकटला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. या संधीचा फायदा जयदेवला करायला आवडेल अन्यथा त्याला संघातून बाहेर जावे लागले.

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ : रोहित शर्मा, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे, केएस भरत, इशान किशन, आर.के. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com