भारतीयांची आज अग्निपरीक्षा ; आशियाई फुटबॉल स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार

Asian Football India's opening match will be against Australia: भारताचा सलामीचा सामना १३ जानेवारीला (शनिवारी) ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. यजमान कतार - लेबनॉन या लढतीने शुक्रवारी प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा श्रीगणेशा होणार आहे.
Asian Football India's opening match will be against Australia
Asian Football India's opening match will be against AustraliaSakal

कतार : एएफसी आशियाई फुटबॉल करंडकाला शुक्रवारपासून (ता. १२) कतार येथे सुरुवात होणार आहे. या स्पर्धेमध्ये २४ देशांचा सहभाग असून भारताचा ब गटामध्ये समावेश करण्यात आला आहे. भारताचा सलामीचा सामना १३ जानेवारीला (शनिवारी) ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. यजमान कतार - लेबनॉन या लढतीने शुक्रवारी प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा श्रीगणेशा होणार आहे.

एएफसी आशियाई करंडकाचे यजमानपद चीनकडे देण्यात आले होते. २०१९मध्ये पॅरिस येथे झालेल्या फिफाच्या बैठकीत याबाबतची घोषणा करण्यात आली होती. तसेच ही स्पर्धा सुरुवातीला १६ जून ते १६ जुलै, २०२३ या दरम्यान खेळवण्यात येणार होती; पण चीनमधील वाढत्या कोरोनामुळे ही स्पर्धा कतार येथे हलवण्यात आली.

स्पर्धेचा फॉरमॅट

एएफसी आशियाई करंडकात २४ देशांचा सहभागी असून त्यांची सहा गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. साखळी फेरीअखेर प्रत्येक गटातील अव्वल दोन देश व तिसऱ्या स्थानावरील सर्वोत्तम चार देश अंतिम १६ फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर तिथून बाद फेरीला सुरुवात होईल. (Competition format)

भारतीय संघाच्या लढती

  • १३ जानेवारी - ऑस्ट्रेलिया

  • १८ जानेवारी - उझबेकिस्तान

  • २३ जानेवारी - सीरिया

(Indian team matches)

एएफसी आशियाई करंडकातील पारितोषिके

  • विजेता संघ - ४१ कोटी

  • उपविजेता संघ - २४ कोटी

  • उपांत्य फेरीतील पराभूत संघ - ८.३ कोटी

  • सहभागी संघ - १.६६ कोटी

(Prizes in the AFC Asian Cup)

आतापर्यंतचे विजेते

  • जपान - १९९२, २०००, २००४, २०११

  • सौदी अरेबिया - १९८४, १९८८, १९९६

  • इराण - १९६८, १९७२, १९७६

  • दक्षिण कोरिया - १९५६, १९६०

  • इस्त्रायल - १९६४

  • कुवेत - १९८०

  • ऑस्ट्रेलिया - २०१५

  • इराक - २००७

  • कतार - २०१९

(Winners so far)

गटवारी

  • अ - कतार, चीन, ताजिकिस्तान, लेबनन

  • ब - ऑस्ट्रेलिया, उझबेकिस्तान, भारत, सीरिया

  • क - इराण, अमिराती, हाँगकाँग, पॅलेस्टाईन

  • ड - जपान, इंडोनेशिया, इराक, व्हिएतनाम

  • ई - दक्षिण कोरिया, मलेशिया, जॉर्डन, बहरीन

  • फ - सौदी अरेबिया, थायलंड, किर्गीस्तान, ओमान

(Grouping)

या खेळाडूंवर असणार नजरा

सोन ह्योंग मिन (दक्षिण कोरिया, टोटेनहॅम क्लब), वाटारू एंडो (जपान, लिव्हरपूल क्लब), काओरू मितोमा (जपान, ब्रायटन क्लब), ताकुमी मिनामिनो (जपान, मोनॅको क्लब), ताकेहिरो तोमियासू (जपान, आर्सेनल क्लब), सरदार अझमाऊन (इराण, रोमा क्लब), किम मिनजे (दक्षिण कोरिया, बायर्न म्युनिच क्लब). (Keep an eye on these players)

दिग्गज प्रशिक्षकांचा परीस स्पर्श

रोबर्टो मॅनचिनी (इटली, सौदी अरेबिया), जर्गेन क्लीन्समन (जर्मनी, दक्षिण कोरिया), हेक्टर कुपर (अर्जेंटिना, सीरिया). (Touch of legendary coaches)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com