Women's T20 World Cup : पूनमने घेतली कांगारुंची फिरकी; भारताचा दणक्यात विजय

वृत्तसंस्था
Friday, 21 February 2020

महिला टी20 विश्वकरंडकाच्या पहिल्या सामन्यात फलंदाजीमध्ये अपयशी ठरला तरी भारतीय संघाने गोलंदाजीच्या बळावर पहिल्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर दणक्यात विजय मिळवला आहे. 

सिडनी : महिला टी20 विश्वकरंडकाच्या पहिल्या सामन्यात फलंदाजीमध्ये अपयशी ठरला तरी भारतीय संघाने गोलंदाजीच्या बळावर पहिल्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर दणक्यात विजय मिळवला आहे. 

इंग्लंडमधला फेल होणारा कोहली परत आलाय! कसा आउट झालाय बघा

पूनम यादवच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर 17 धावांनी विजय मिळवला आणि विश्वकरंडकातील पहिला सामना जिंकला. भारतीय संघाच्या आत्मविश्वासासाठी हा सामना जिंकणे खूप महत्वाचे होते. पूनमने टप्प्याटप्प्याने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना बाद करत त्यांचा डाव सावरुच दिला नाही. भारतीय गोलंदाजीमध्ये राजेश्वरी गायकवाडने एक, शिखा पांडेने तीन  तर पूनमने चार फलंदाजांना बाद केले. शेवटच्या 23 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज असताना भारताने ऑस्ट्रेलियाच्या सर्व विकेट घेत विजय संपादन केला. 

आता खेळत होता अन् आता भारताच्या स्पिनरने केली निवृत्ती जाहीर

प्रथम फलंदाजी करताना प्रथम फलंदाजी करताना भारताकडून शेफाली वर्माने जोरदार सुरवात केली. तिने दोन षटकांमध्ये एक षटाकर आणि पाच चौकारांची बरसात केली आणि 15 चेंडूंत 29 धावा केल्या. भरवशाची फलंदाज स्मृती मानधाना दहा धावांवर बाद झाली. त्यानंतर दोन धावा जमा करुन लगेच शेफाली बाद झाली. हे कमी म्हणून कर्णधार हरमनप्रीतही पाठेपाठ दोन धावांवर बाद झाली आणि भारत अडचणीत आला. मधल्या फळीत दिप्ती शर्माने केलेल्या नाबाद 49 धावांच्या जोरावर भारताने 132 धावांचे लक्ष्य गाठले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India wins 1st match against australia in T20 world Cup