प्रकाशझोत सुरु होण्याअगोदरच विंडीजचे दिवे विझले

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील अखेरच्या सामन्यात भारताने विंडीजवर नऊ खेळाडू राखून विजय मिळवित पाच सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली.

तिरुअनंतपुरम : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील अखेरच्या सामन्यात भारताने विंडीजवर नऊ खेळाडू राखून विजय मिळवित पाच सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली. विंडीजने दिलेल्या 105 धावांचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर रोहित शर्माने 63 धावा केल्या तर कर्णधार विराट कोहलीने 33 धावा केल्या. 

प्रथम फलंदाजी करताना विंडीजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर सहज शरणागती पत्करली. विंडीजचे सर्व फलंदाज अवघ्या 32 षटकांत बाद झाले. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक चार बळी टिपले. तसेच जसप्रित बुमरा आणि खलील अहमद यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद केले. 

भारताचा सलामीवीर शिखर धवन सहा धावांवर बाद झाल्यावर रोहित आणि कोहलीने 105 धावांचे माफक आव्हान अवघ्या 14.5 षटकांत पार केले. या विजयासह भारताने मायदेशात सलग सहा एकदिवसीय मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. 2015-16 मध्ये दक्षिण आफ्रिकने भारताला 3-2 असे पराभूत केले होते. त्यानंतर भारतीय संघ अपराजित आहे.  

धावफलक :
वेस्ट इंडीज : ३१.५ षटकांत सर्वबाद १०४
जेसन होल्डर २५, मार्लन सॅम्युअल्स २४, रवींद्र जडेजा ४-३४, जसप्रित बुमरा २-११, खलील अहमद २-२९
पराभूत विरुद्ध
भारत : १४.५ षटकांत एक बाद १०५
रोहित शर्मा नाबाद ६३, विराट कोहली नाबाद ३३


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India wins the odi series against west indies