भारताच्या महिला हॉकी संघाचे स्वप्न भंग; नेदरलँडकडून ३-० असा पराभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 India women hockey team Defeat Netherland 3-0 Dream

भारताच्या महिला हॉकी संघाचे स्वप्न भंग; नेदरलँडकडून ३-० असा पराभव

पोचेफस्ट्रूम : ड गटाच्या साखळी फेरीत सलग तीन लढतींमध्ये विजय मिळवणाऱ्या भारताच्या महिला हॉकी संघाचे ज्युनियर हॉकी विश्‍वकरंडकाच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच पोहोचण्याचे स्वप्न रविवारी भंग झाले. नेदरलँडच्या महिला हॉकी संघाने येथे पार पडलेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारतावर ३-० अशा फरकाने विजय मिळवला व अंतिम फेरीत प्रवेश केला. भारतीय संघाचे आव्हान मात्र उपांत्य फेरीतच संपुष्टात आले.

११व्या मिनिटाला बीतस्मा तेसा हिने, ५२व्या मिनिटाला फोके लूना हिने आणि ५३व्या मिनिटाला डिके झिप हिने नेदरलँडसाठी गोल केले.

२०१३ ची पुनरावृत्ती

भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाने जर्मनी येथे २०१३मध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये इंग्लंडला हरवत तिसरा क्रमांक पटकावला होता. यंदाही भारताचा संघ उपांत्य फेरीत पराभूत झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या व चौथ्या स्थानासाठीच्या लढतीत या संघाला झुंजावे लागणार आहे.

Web Title: India Women Hockey Team Defeat Netherland 3 0 Dream

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Indiahockey
go to top