बर्लिन : भारतीय महिला हॉकी संघाच्या पराभवाचे शुक्लकाष्ठ कायम राहिले. प्रो लीग हॉकी स्पर्धेतील युरोपियन टप्प्यात आज भारतीय संघाचा चीनकडून ०-३ असा पराभव झाला. भारताचा हा स्पर्धेतील सातवा पराभव आहे..पराभवांच्या या मालिकेमुळे भारतीय संघ १५ सामन्यांतून १० गुणांसह नऊ संघांमध्ये तळाच्या स्थानावर आहे. इंग्लंडचा संघ जर्मनीविरुद्ध सलग दोन दिवसांत दोन सामने खेळणार आहे. ते गुणतक्त्यात भारताच्या पुढे आहेत. .भारतीय संघ तळातच राहिला तर प्रो लीगमधून भारतीय संघ बाहेर जाईल आणि त्यांना नेशन्स करंडक स्पर्धा खेळावी लागेल..Smriti Mandhana : स्मृती मानधनाचे तुफानी शतक; पहिल्या ट्वेन्टी-२० मध्ये भारताकडून इंग्लंडचा धुव्वा.आजच्या सामन्यात चीनकडून चेन यंग (२१वे मिनिट), झेंग यिंग (२४) यांनी पेनल्टी कॉर्नरवर गोल केले तर अनहुन यू हिने ४५व्या मिनिटाला मैदानी गोल केला. भारताने या सामन्यात चांगली सुरुवात केली होती; परंतु गोल करण्यात अपयश आले. बलजीत कौरला तिसऱ्याच मिनिटाला सुवर्णसंधी मिळाली होती; परंतु तिने मारलेला फटका गोलजाळ्याच्या बाहेरून गेला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.