
नवी दिल्ली: भारतीय ॲथलिट्समध्ये डोपिंगचा वाढलेला वापर रोखण्यासाठी भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने आता कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली असून, महासंघाकडे नोंदणी नसलेल्या प्रशिक्षकांकडे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंची अर्जुन, खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे डोपिंगला आळा घालता येईल, असे महासंघाला वाटते.