Ind vs Eng : भारताचे फलंदाज फिरकी खेळायला विसरले? इंग्लंडविरूद्धची आकडेवारीच सांगते सर्वकाही

India vs England 2nd Test :
indian batsman struggle against england spinners ind vs eng 2nd test cricket news in marathi
indian batsman struggle against england spinners ind vs eng 2nd test cricket news in marathi sakal

India vs England 2nd Test : इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियासाठी यशस्वी जैस्वालची 209 धावांची खेळी सोडली, तर उर्वरित कोणत्याही भारतीय फलंदाजाला 40 धावांचा टप्पाही पार करता आला नाही. भारताने पहिल्या डावात इंग्लंडविरुद्ध 396 धावा केल्या. पण भारताचे बहुतांश फलंदाज इंग्लंडच्या फिरकीपटूंविरुद्ध झुंजताना दिसले. जणू त्यांना इंग्लंडच्या युवा फिरकीपटूंची गोलंदाजीच कळतच नव्हती.

हैदराबाद कसोटी सामन्यातही हीच स्थिती पाहायला मिळाली. ज्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात 420 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. याच खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांना 230 धावांचे लक्ष्यही गाठता आले नाही. त्यानंतर प्रत्येक भारतीय चाहत्याच्या मनात एकच प्रश्न आला की भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजी खेळायला विसरले आहेत का?

indian batsman struggle against england spinners ind vs eng 2nd test cricket news in marathi
Ind vs Eng : अश्विन हे करतोय तरी काय... आधी अंपायर नंतर अँडरसनशी भिडला...! जाणून घ्या प्रकरण

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळला गेला होता. ज्यामध्ये इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 246 धावा केल्या. भारताच्या फिरकीपटूंनी या डावात 8 विकेट्स घेतल्या होत्या. भारत फलंदाजीला आला तेव्हा त्यांनी 436 धावांची मोठी धावसंख्या उभारली. मात्र 10 पैकी 9 फलंदाजांनी फिरकी गोलंदाजांसमोर गुडघे टेकवले. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्या पहिल्या डावात केवळ पार्ट टाईम फिरकी गोलंदाज जो रूटने इंग्लंडकडून सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.

indian batsman struggle against england spinners ind vs eng 2nd test cricket news in marathi
Jasprit Bumrah IND vs ENG : रिव्हर्स स्विप, स्विच हिटच्या बादशाहचा बुमराहने उतरवला माज; पाहा VIDEO

त्यानंतर भारताच्या दुसऱ्या डावात पुन्हा एकदा इंग्लंडच्या फिरकीपटूचा कहर पाहिला मिळाला. या डावात टॉम हार्टलेने सर्वाधिक 7 विकेट घेतल्या. हैदराबाद कसोटीपूर्वी टॉम हार्टले केवळ 21 प्रथम श्रेणी सामने खेळला होता, ज्यामध्ये त्याने केवळ 49 विकेट घेतल्या होत्या.

यावरून हे स्पष्ट होते की, पहिल्या डावात जो रूट तर दुसऱ्या डावात पदार्पण करणाऱ्या टॉम हार्टलीची फिरकीही भारतीय फलंदाजांना समजली नाही. त्याचाच परिणाम असा झाला की पहिल्या डावात 190 धावांची मोठी आघाडी घेऊनही भारताला 28 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

हैदराबाद कसोटी हरल्यानंतर भारतीय फलंदाज विशाखापट्टणमला गेले, यावेळी त्यांच्याकडून फिरकीविरुद्ध चांगली फलंदाजी करणे अपेक्षित होते. मात्र यावेळीही तीच परिस्थिती दिसून आली. आधी शोएब बशीरच्या एका खराब चेंडूवर कर्णधार रोहित शर्मा बाद झाला. त्याच्यानंतर श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, अक्षर पटेल आणि केएस भरत या फलंदाजांनीही फिरकीविरुद्ध विकेट गमावल्या.

दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी इंग्लंडकडून प्रत्येकी 3 बळी घेतल्या, तर टॉम हार्टलीला फक्त 1 विकेट घेतली. 3 फलंदाजांची जेम्स अँडरसनने शिकार केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com