
WI vs IND Team India Squad : आयपीएलचा 16 वा हंगाम नुकताच पार पडला. या हंगामात अनेक युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. यात यशस्वी जैसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह यांचा समावेश होता. या सर्व युवा खेळाडूंची आयपीएलमधील कामगिरी पाहून ते लवकरच भारतीय संघात दिसतील असे अनेक आजी - माजी क्रिकेटपटूंनी सांगितले.
बीसीसीआयने नुकतेच वेस्ट इंडीज दौऱ्यातील कसोटी आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. यात राजस्थान रॉयल्सकडून धावांचा पाऊस पाडणाऱ्या यशस्वी जैसवालला कसोटी संघात स्थान मिळाले आहे.
तिलक वर्मा आणि रिंकू सिंह हे देखील टी 20 संघात स्थान मिळवतील अशी दाट शक्यता आहे. दुसरीकडे रणजी ट्रॉफीमध्ये शतकांचा रतीब घालणारा सर्फराज खानकडे पुन्हा एकदा निवडसमितीने कानाडोळा केला आहे.
हाच मुद्दा पकडून भारताचा फलंदाज अभिनव मुकूंदने बीसीसीआयच्या निवडसमितीवर टीका केली. त्याने ट्विट करत म्हणाला की देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून आयपीएलमध्ये कामगिरी करणऱ्या खेळाडूंच्या पारड्यात वजन टाकले जात आहे.
अभिनव आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, 'संघाची झालेली निवड समजण्यापलीकडेची आहे. माझ्या डोक्यात अनेक विचार येत आहेत. ते मी या ट्विटमध्ये एकत्रित करून लिहीतोय. मात्र आपल्या राज्याकडून खेळण्याचा अभिमान बाळगणाऱ्या खेळाडूंचा काय फायदा होतोय? स्पष्टपणे दिसतंय की फ्रेंचायजी क्रिकेट खेळून तुम्ही जास्त लवकर संघात पोहचू शकता.'
भारतीय कसोटी संघात युवा खेळाडूंना संधी द्यायची असेल तर त्यासाठी सर्फराज खान आणि अभिमन्यू इश्वरन यांना ती मिळायला हवी होती अशी जोरदार चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात सुरू झाली आहे.
यशस्वी जैसवाल आणि ऋतुराज गायकवाड यांची वेस्ट इंडीज दौऱ्यावरील कसोटी मालिकेसाठीच्या कसोटी संघात निवड झाली आहे. या दोघांनीही आयपीएलमध्ये त्यांच्या फ्रेंचायजीकडून चांगल्या धावा केल्या होत्या.
अभिनव मुकूंद सोबतच भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर आणि आकाश चोप्रा यांनी देखील बीसीसीआयच्या निवडसमितीवर टीका केली आहे. कसोटी स्पेशलिस्ट असलेला चेतेश्वर पुजारा देखील संघात नाहीये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.