चिकू भैय्या की तेरे नाम? तुम्हीच बघा विराट कोहलीचा हा लूक!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने शुक्रवारी (ता.20) इन्स्टाग्राम आणि ट्विटर या सोशल साईट्सवर एक फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी या पोस्टवर उड्या घेतल्या.

सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान ट्वेंटी-20 मालिका सुरू आहे. पहिला सामना पावसाने वाया गेल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने आफ्रिकेवर विजय मिळवला. आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पुढचा आणि शेवटचा सामना बेंगलोर येथे होणार असून या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. 

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने शुक्रवारी (ता.20) इन्स्टाग्राम आणि ट्विटर या सोशल साईट्सवर एक फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी या पोस्टवर उड्या घेतल्या. विराटने 16 वर्षापूर्वीचा आणि सध्याचा एक फोटो अपलोड केला असून, मी जेव्हा माझ्या लहानपणीचा फोटो पाहतो, असे कॅप्शन दिले आहे. 16 वर्षापूर्वीच्या फोटोमध्ये विराटने केस वाढविलेले दिसत आहेत.  

यावर नेटकऱ्यांनी हरतऱ्हेच्या कमेंट केल्या आहेत. कुणी त्याला यशाचे उत्तम उदाहरण असे म्हटले आहे. तर एकाने एक सामान्य मुलगा आज क्रिकेटवर राज्य करतो असे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने त्याची तुलना अभिनेता सलमान खानच्या तेरे नाम मधील राधे या पात्राशी केली आहे. तर विराटच्या काही चाहत्यांनी त्याचे जुने फोटो शेअर केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian cricket captain Virat Kohli shared his old memories on twitter