Indian cricket : मला ‘धोनी’ व्हायला आवडेल : पंड्या

स्वतःच्या खेळापेक्षा संघाचे हित महत्त्वाचे, संयमालाही प्राधान्य!
Hardik Pandya
Hardik Pandyasakal

अहमदाबाद : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने बुधवारी येथे झालेल्या लढतीत न्यूझीलंडचा १६८ धावांनी धुव्वा उडवला आणि टी-२० मालिका खिशात घातली. क्रिकेट कारकीर्दीच्या सुरुवातीला आक्रमक फलंदाजी करणारा हार्दिक गेल्या काही काळात टीम इंडियासाठी डाव सावरण्याची भूमिका पार पाडत आहे.

याच पार्श्वभूमीवर तो म्हणाला, भारतीय संघाच्या यशात मला वाटा उचलायला नक्कीच आवडेल. यासाठी धावगती कमी झाली तरी चालेल. डावाला आकार देण्यासाठी मी सज्ज असेन. मला धोनीची भूमिका करायला आवडेल, असे हार्दिक आवर्जून म्हणाला.

हार्दिक पुढे म्हणाला, मला षटकार मारायला आवडतात. हे मी मनापासून सांगतोय, पण आता माझ्याकडे अनुभवाची शिदोरी आहे. माझ्या खेळामध्ये विकास झाला आहे. याचा फायदा मला भारतीय संघाला करून द्यायचा आहे. मला भागीदारी करायला आवडते. या संघात माझ्याएवढा अनुभव कोणाकडे नाही. त्यामुळे दबावाखाली मला संयमी राहून खेळ करायला हवा. हे मी जाणतो. याच कारणामुळे माझ्या खेळात बदल केला, असे हार्दिक स्पष्ट करतो.

आता लक्ष्य झटपट क्रिकेटवर

भारतामध्ये या वर्षी एकदिवसीय क्रिकेट विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच २०२४मध्ये वेस्ट इंडीजमध्ये टी-२० विश्‍वकरंडकाचा थरार रंगणार आहे. याच कारणामुळे हार्दिक पंड्याने सध्या तरी झटपट क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केले आहे. सध्या तरी मी झटपट क्रिकेटवर लक्ष देत आहे, असे हार्दिक म्हणाला.

मोलाचा सल्ला : शुभमन गिल

न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या टी-२० लढतीत हार्दिक पंड्याच्या सल्ल्यामुळे दमदार फलंदाजी करता आली, असे शतकवीर शुभमन गिल याप्रसंगी म्हणाला. गिल पुढे सांगतो की, मिचेल सॅंटनर अखेरचे षटक टाकत होता. मी छान फलंदाजी करीत होतो. त्यावेळी त्याच्या गोलंदाजीवर आक्रमक फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण हार्दिकने सांगितले सँटनर चांगली गोलंदाजी करीत आहे. हे षटक खेळून काढ. इतर गोलंदाजांवर हल्लाबोल कर. त्याचे मी ऐकले. सध्या मला जशी हवी तशी फलंदाजी करता येत आहे. मानसिकदृष्ट्या मी सक्षम आहे, असे गिल आवर्जून म्हणाले.

विराटकडूनही कौतुक

शुभमन गिलच्या फलंदाजीचे विराट कोहलीकडूनही कौतुक करण्यात आले. गिलच्या शतकी खेळीनंतर विराटने सामाजिक माध्यमावर त्याच्या खेळाची स्तुती करताना म्हटले की, तो तारा आहे... भारतीय क्रिकेटचे भविष्य... भारतीय क्रिकेट संघाचे भविष्य म्हणून त्याने गिलकडे इशारा केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com