सूर्यकुमार दुसऱ्या स्थानावर कायम

इशान किशन व रोहित शर्मा अनुक्रमे १५व्या व १६व्या स्थानावर आहेत.
suryakumar yadav
suryakumar yadavsakal

दुबई : भारतीय क्रिकेट संघाने मागील सात टी-२० मालिकांमध्ये पराभव पाहिलेला नाही. यापैकी सहा मालिका जिंकण्यात या संघाला यश प्राप्त झाले आहे अन्‌ याच कारणामुळे भारतीय संघ आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम आहे. याचसह टी-२० क्रिकेटमध्ये जबरदस्त फलंदाजी करीत भारतासाठी मोलाची कामगिरी बजावणारा सूर्यकुमार यादव हाही फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर कायम आहे. श्रेयस अय्यरने २५ व्या स्थानावरून १९ व्या स्थानावर मुसंडी मारली आहे. इशान किशन व रोहित शर्मा अनुक्रमे १५व्या व १६व्या स्थानावर आहेत.

टी-२० क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा बाबर आझम पहिल्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. तसेच अफगाणिस्तानचा खेळाडू मोहम्मद नाबी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.

अव्वल खेळाडूंमध्ये भारतीयांची संख्या कमीच

भारतीय संघ टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान असला तरी फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल दहामध्ये भारतीय खेळाडूंची संख्या कमीच आहे. सूर्यकुमार यादव फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या, तर भुवनेश्‍वरकुमार गोलंदाजांच्या यादीत नवव्या स्थानावर आहे. या दोघांव्यतिरिक्त एकही भारतीय टी-२० क्रमवारीत अव्वल दहामध्ये नाही.

आयसीसीची

टी २० क्रमवारी

अव्वल पाच फलंदाज

१) बाबर आझम

२)सूर्यकुमार यादव

३) मोहम्मद रिझवान

४) एडन मार्करम

५) डेव्हिड मलान

अव्वल पाच गोलंदाज

१) जोश हेझलवूड

२) तबरेझ शम्सी

३) राशीद खान

४) अदिल रशीद

५) ॲडम झाम्पा

अव्वल पाच अष्टपैलू खेळाडू

१)मोहम्मद नाबी

२) शाकीब अल हसन

३) मोईन अली

४) ग्लेन मॅक्सवेल

५) रोहन मुस्तफा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com