IND vs SL 3rd ODI : टीम इंडियाची पद्मनाभस्वामी मंदिराला भेट; फोटो झाले व्हायरल

Indian cricket team visits famed Padmanabhaswamy temple in Trivandrum
Indian cricket team visits famed Padmanabhaswamy temple in Trivandrum

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात आज वनडे मालिकेतील शेवटचा सामना होणार आहे. हा सामना केरळच्या ग्रीन फिल्ड स्टेडियमवर होणार असून या सामन्यासाठी शुक्रवारी भारतीय संघ केरळच्या तिरुअनंतपुरम येथे पोहोचला. दरम्यान, टीम इंडियाच्या खेळाडूंनी प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिराला भेट दिली. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(Indian cricket team visits famed Padmanabhaswamy temple in Trivandrum)

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेतील अखेरचा सामना केरळच्या ग्रीन फिल्ड स्टेडियमवर होणार आहे. तिरुअनंतपूरम मध्ये तिसऱ्या वनडे सामन्यासाठी आलेल्या भारतीय संघाने श्री पद्मनाभस्वामी मंदिराला भेट दिली. यावेळी संघातील काही खेळाडू आणि सपोर्टींग स्टाफ देखील उपस्थित होते. यावेळी खेळाडूंनी मंदिरात येऊन दर्शन घेत पूजा देखील केल्याची माहिती आहे.

सध्या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये सर्व खेळाडू आणि सपोर्टींग स्टाफ हे केरळच्या पारंपरिक वस्त्र परिधान केलेले पहायला मिळत आहेत.

वनडे मालिकेत आतापर्यंत भारताने दोन सामने जिंकले असून मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळवली आहे. या दोन विजयासह भारताने श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका जवळपास खिशात घातली आहे. यापूर्वी झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका टी 20 मालिकेत देखील भारताने श्रीलंकेवर 2-1 ने विजय मिळवून मालिका विजय प्राप्त केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com