World Archery 2025: महाराष्ट्राच्या गाथा खडके, शर्वरी शेंडेला ब्राँझ; जागतिक तिरंदाजी स्पर्धा, भारतीय खेळाडूंची धडाकेबाज कामगिरी
India Bronze Medal: सोलापूरच्या गाथा खडके आणि पुण्याच्या शर्वरी शेंडे यांनी जियानाकुमारच्या साथीने जागतिक तिरंदाजी स्पर्धेत ऐतिहासिक ब्राँझपदक पटकावले. अमेरिकन संघावर ६-० असा धुव्वा उडवत भारताने कॅनडामध्ये किमया साधली.
पुणे : महाराष्ट्राच्या गाथा खडके व शर्वरी शेंडे या खेळाडूंनी जियानाकुमारच्या साथीने जागतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये ब्राँझपदकावर मोहर उमटवली. कॅनडा येथील स्पर्धेमध्ये भारताकडून खेळताना मुलींनी देदीप्यमान कामगिरी केली, हे विशेष.