
लास वेगास : भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगसीने उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोवचा पराभव करत फ्रीस्टाइल ग्रँडस्लॅम टूर स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे, आर. प्रज्ञानंदला अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्याच्या विजेतेपदाच्या आशा संपुष्टात आल्या.