Indian Hockey Team : ''अशी सुरू आहे आशियाई गेम्सची तयारी..." मोठ्या विजयानंतर भारतीय हॉकी कर्णधाराने दिली ललकार

Indian Hockey Team
Indian Hockey Teamsakal
Updated on

Indian Hockey Team captain Harmanpreet Singh : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने रविवारी राऊंड-रॉबिन सामन्यात मलेशियाचा 5-0 असा पराभव करून अव्वल स्थानावर शिक्कामोर्तब केले. या विजयानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंगने सांगितले की, संघ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी अशा प्रकारे तयारी करत आहे.

तत्पूर्वी, भारताने शुक्रवारी जपानशी 1-1 अशी बरोबरी साधली आणि पहिल्या सामन्यात यजमान भारताने गुरुवारी चीनवर 7-2 असा मोठा विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली.

Indian Hockey Team
Australia WC Squad: ODI वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा! मार्नस लबुशेनला डच्चू, डेव्हिड वॉर्नरच काय झालं?

तीन सामन्यांत दोन विजय आणि एक अनिर्णित आणि एकूण सात गुणांसह भारत अव्वल स्थानावर आहे. मलेशिया तीन सामन्यांत दोन विजय आणि एक पराभव आणि एकूण सहा गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

सामन्यानंतर हरमनप्रीत सिंग म्हणाला की, ''तुम्ही बघितले तर आम्ही आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी कशा प्रकारे तयारी करत आहोत. आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी आम्हाला चांगले सामने खेळायला मिळत आहेत. हे आपल्यासाठी चांगले आहे. या स्पर्धेत जे काही शिकलो त्यावर आम्ही काम करू शकतो. आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी आशियाई देशांविरुद्ध खेळण्याची ही चांगली संधी आहे'.

Indian Hockey Team
Wi vs Ind 2nd T20 : 'तुम्ही आता जबाबदारी घ्या...' सलग 2 पराभवानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर

पुढे तो म्हणाला की, 'नक्कीच मला वाटते की आमचा पहिला सामनाही चांगला होता, कारण आम्ही खूप गोल केले. पण दुसरा सामना संघासाठी थोडा खडतर होता. जपानने त्या दिवशी खरोखरच चांगली कामगिरी केली. आमच्या मागील सामन्यातून आम्ही काय शिकलो ते म्हणजे आमचा बचाव मजबूत ठेवणे आणि येणाऱ्या संधीचा फायदा घेणे.'

हरमनप्रीत सिंग यावेळी बोलताना म्हणाला, 'देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तुम्ही जर्सी घालता तेव्हा ही अभिमानाची भावना असते. तो आमच्या कुटुंबाचा आधार आहे. तर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी देशाचे प्रतिनिधित्व करत आहे.'

समारोप करताना तो म्हणाला, 'संघ चांगले आहेत. युरोपीय राष्ट्रांविरुद्ध खेळल्यानंतर आशियाई देशांविरुद्ध खेळताना अचानक जुळवून घेण्यास वेळ लागतो. आम्हाला माहित आहे की आम्हाला काय करायचे आहे आणि बॉलसह किंवा त्याशिवाय कुठे काम करायचे आहे. आम्ही संघाच्या बैठकीत यावर चर्चा करू.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com