Kabaddi: भारतीय नौदलाचा 'बंड्या मारुती' चषकावर कब्जा! भरत हुडा ठरला १ लाखाचा मानकरी; फायनलमध्ये यु.पी. योद्धाचा धुव्वा

Indian Navy Clinches Bandya Maruti Kabaddi Title: बंड्या मारूती अमृत महोत्सवी अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत भारतीय नौदलाने यूपी योद्धावर विजय मिळवत विजेतेपद पटकावले. भरत हुडा सर्वोत्तम खेळाडू ठरला.
Kabaddi

Kabaddi

sakal

Updated on

मुंबई : भारतीय नौदलाने बंड्या मारूती सेवा मंडळाने आयोजित केलेल्या अखिल भारतीय पुरुष व्यवसायिक कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकविले. नौदलाचा भरत हुडा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला रोख रु. एक लाख(₹१०००००) देऊन गौरविण्यात आले. बंड्या मारूती संघाने आपल्या अमृत महोत्सवी वर्ष आणि हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन केले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com