स्मृती मानधना ठरली 'आयसीसी वुमेन ऑफ द इयर'

Smriti Mandhana Won ICC Womens Cricketer of 2021
Smriti Mandhana Won ICC Womens Cricketer of 2021 esakal

दुबई : भारतीय महिला संघाची स्टार ओपनर स्मृती मानधनने (Smriti Mandhana) २०२१ ची रिचेल फ्लिंट ट्रॉफी जिंकत आयीसी वुमेन्स क्रिकेटर ऑफ २०२१ (ICC Womens Cricketer of 2021) चा पुरस्कार मिळवला आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील ८ सामन्यांपैकी फक्त दोन सामने जिंकण्यात यश मिळवले होते. त्या दोन्ही सामन्यात स्मृती मानधनाने मोठी कामगिरी केली होती. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १५८ धावांचा पाठलाग करताना स्मृती मानधाना ८० धावांची खेळी केली होती. तर मालिेळकेतील शेवटच्या टी २० सामन्यात स्मृती मानधनाने ४८ धावांची नाबाद खेळी केली होती. (Indian Opener Smriti Mandhana named ICC Womens Cricketer of 2021)

Smriti Mandhana Won ICC Womens Cricketer of 2021
फक्त सहा ODI खेळणारा बाबर आझम ठरला 'ICC ODI Cricketer of 2021'

याचबरोबर स्मृती मानधानाने (Smriti Mandhana) इंग्लंड (England) विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात पहिल्या डावात ७८ धावांची खेळी केली होती. हा सामना अनिर्णित राहिला होता. याचबरोबर भारताने २०२१ मध्ये जिंकलेल्या एकमेव एकदिवसीय मालिकेत देखील तिने ४९ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. होती. याचबरोबर स्मृती मानधानाने भारतीय महिला संघाच्या पहिल्या गुलाबी चेंडूवर (Pink Ball Test) खेळवल्या गेलेल्या सामन्यात शतक झळकावून इतिहास रचला होता. तिच्या १२७ धावांचा दमदार खेळीच्या जोरावर भारत मजबूत स्थितीत पोहचला होता. हा सामना अनिर्णित राहिला होता. या सामन्यात स्मृती मानधनाला सर्वोकृष्ठ खेळाडूचा मानही मिळाला होता. (Smriti Mandhana News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com